Headlines

राज ठाकरेंना दहीहंडीपेक्षा मटन हंडी महत्त्वाची:अमित ठाकरेंनी चर्चेला यावे, रांचो कोण अन् चतूर कोण महाराष्ट्रच ठरवेल- नवनाथ बन




अमित ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर कुठल्याही विषयावर मी चर्चा करायला तयार आहे, मग त्यावेळी रांचो कोण, चतुर्लिंगम कोण ते महाराष्ट्र ठरवेल. ज्या अमित ठाकरेंना 4 लोकांमध्ये उभे राहत भाषण करता येत नाही, ते भाषण विसरतात त्या पक्षाने भाजपला चॅलेज करू नये, गजानन काळेंनी अमित ठाकरेंना चर्चेला आणावं, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा अमित ठाकरेंशी चर्चा करायला तयार आहे. नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरे आणि मनसेचे दुकान बंद करण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. राज ठाकरे यांना दहीहंडीपेक्षा मटन हंडी महत्त्वाची आहे. दादरमध्ये मालकाच्या मुलाची अनामत रक्कम जप्त झाली याला दुकान बंद होणे म्हणतात, अनेक मनपात तर खातेही उघडता आले नाही, याला दुकान बंद होणे म्हणतात. जनतेने मनसेचे दुकान बंद केले आहे. संदीप देशपांडे यांचे मार्केट गजानन काळे यांनी घालवले आहे. मी ज्या भागातून निवडून आलो आहे तिथे यापूर्वी कधीही भाजपचे नगरसेवक निवडून आला नव्हता. माझ्या आजूबाजूला एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. तुम्हाला दादरमध्ये अनामत रक्कम वाचवता आली नाही. अत्याचारी बॉय गजानन काळेंनी मला शिकवू नये नवनाथ बन म्हणाले की, मनसेचा एक प्रवक्ता ज्यांचे तोंड महिलांनी केलेल्या आरोपामुळे काळं झाले आहे, ते गजानन काळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करत आहेत. ते काय आहेत हे महाराष्ट्राला आणि जनतेला माहिती आहे. काळे जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आणि खोडसाळपणाचे आहेत. रवींद्र चव्हाण यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते सर्व राजकीय होते, त्यामधून त्यांची निर्दोष मुक्तता सुद्धा करण्यात झाली आहे. राजकीय आंदोलनामुळे दाखल झालेल्या गुन्हाचा हवाला देत गजानन काळे रवींद्र चव्हाणांवर आरोप करत आहे ते म्हणजे सुर्यांवर थुंकण्यासारखे आहे. गजानन काळेंवर अनेक महिलांनी आरोप केले आहेत, महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असणाऱ्यांनी इतरांवर आरोप करू नये. तुम्हाला आणि तुमच्या मालकाच्या मुलाला एकदाही जनतेमधून निवडून येता आले नाही त्याकडे लक्ष द्या आणि मग भाजपवर टीका करा.
गजानन काळे हे अत्याचारी बॉय नवनाथ बन म्हणाले की, गजानन काळे हे राज ठाकरेंचे अत्याचारी बॉय आहे, देवाभाऊंचा कॉम्प्लॅन बॉय असणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे. तुमच्यासारखे खंडणी वसुली, महिलांना छेडणं, महिला अत्याचार नवनाथ बन करत नाही. नवनाथ बन हा देवाभाऊंचा कॉम्प्लॅन बॉय आहे. देवाभाऊंचा शिष्य असल्याचा मला अभिमान तर गजानन काळे हे तुम्ही अत्याचारी बॉय आहेत. राऊतांना संपादक म्हणून काही माहिती नाही नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत स्वत:ला संपादक म्हणून घेता पण त्यांना अभंगाबद्दल काही माहिती नाही ते आता जनाब झाले आहेत. त्यांना गाथा, अभंग यात फरक कळत नाही. सावता माळीचे अभंग तुकोबांच्या तोंडी घालत आहेत, कारण राऊतांना आता कुराण जास्त प्रिय झाले आहे. डब्ब्यात काय आणावे आणि काय नाही असे आदेश कुणीही देऊ नये तो अधिकार नरेंद्र मेहता यांच्या शाळेंनी देऊ नये. हे ही वृत्त वाचा डब्यात कांदा-लसूण नको म्हणणाऱ्या शाळांना टाळे लावा:धर्म तुमच्या घरात, तो शाळेपर्यंत येता कामा नये, हे लव्ह जिहादपेक्षा भयंकर – राऊत

शाळेच्या डब्यात मुलांनी काय आणावे हे सांगणाऱ्या आणि कांदा-लसूण खाण्यावर बंदी घालणाऱ्या शाळांना सरकारने तात्काळ टाळे लावले पाहिजे. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे, तो शाळेच्या वेशीपर्यंत येता कामा नये. महाराष्ट्रातील जनतेने काय खायचे आणि काय नाही, हे ठरवणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता कोण आहेत? महाराष्ट्रात धर्माच्या नावावर अशी बंधने लादली जात असतील तर हे ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर आहे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *