![]()
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. नागरिकांची मोठी गर्दी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी 12 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत, म्हणजे गणपती विसर्जन होईपर्यंत, दररोज 24 तास लागू राहील. गणेशोत्सवात मध्यवर्ती रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीतून जड वाहने गेल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोटार वाहन कायद्यातील नियमांनुसार हा आदेश काढण्यात आला आहे. या बंदीमध्ये शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त चौक ते अलका चौक, टिळक रस्त्यावरील जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रस्त्यावरील शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक ते अलका चौक आणि केळकर रस्त्यावरील फुटका बुरूज ते अलका चौक या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक आणि जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक ते खंडुजीबाबा चौक या मार्गांवरही जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते सावरकर चौक, तसेच गणेश रस्ता-मुदलियार रस्त्यावरील पॉवर हाऊस, दारूवाला पूल, जिजामाता चौक आणि फुटका बुरूज चौक या परिसरातही जड वाहनांना प्रवेशबंदी असेल. मात्र, अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका आणि गणेशमूर्तींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Source link
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांना प्रवेशबंदी:12 ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत, गणपती विसर्जन होईपर्यंत, 24 तास लागू राहील