Headlines

एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा रद्द: निर्णयाला 'मॅट'मध्ये उमेदवाराचे आव्हान:एका उमेदवाराने याचिका दाखल केली; पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्ट रोजी औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयाला एका उमेदवाराने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. हा निर्णय अनेकांसाठी अडचणीचा असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला आहे. मॅटने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. एमपीएससीने या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. अर्जदाराने नियमानुसार अर्ज करून पात्रता मिळवली होती. मात्र, त्यानंतर संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. भाग्यशाली अभ्यंकर आणि ॲड. आशिष मोहोड यांनी बाजू मांडली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती विनय जोशी आणि सदस्य प्रशासन नितीन गद्रे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी प्रवेशाच्या टप्प्यावरच घेतले जाण्याची शक्यता आहे. जर परीक्षा प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय घेतला, तर उमेदवारांना होणारा संभाव्य फटका लक्षात घेऊन योग्य अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी न्यायाधिकरणाकडे पुन्हा दाद मागण्याची मुभाही दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *