Headlines

Rohit Pawar Criticizes CM Fadnavis Over MPSC Paper Leak Probe


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणामुळे राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेत त्यांच्या सर्व

.

‘SIT चं पुढे काय होतं, याचा ताळमेळ नाही’

रोहित पवार यांनी राज्यातील मागील अनेक घटनांचे दाखले देत सरकारच्या तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “आतापर्यंत राज्यात खारघरचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, बदलापूर लैंगिक अत्याचार, भंडारा बलात्कार प्रकरण आणि सुशांतसिंग राजपूत यांसारख्या असंख्य प्रकरणांमध्ये SIT स्थापन करण्यात आली. पण त्याचं पुढे काय झालं? काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही. त्यामुळे आता MPSC पेपरफुटी प्रकरणातही केवळ SIT नेमून सरकार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे.”

‘मित्राला राजीनामा देण्याचा सल्ला द्या’

MPSC च्या कारभारावर बोट ठेवत रोहित पवार यांनी आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईची मागणी केली आहे. “विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, तर सरकारने तत्काळ राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती करावी. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू होईपर्यंत राज्यपाल अध्यक्षांना निलंबित करू शकतात. जर ही कायदेशीर प्रक्रिया सरकारला खूप कठीण वाटत असेल, तर त्यांनी आपल्या मित्राला राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा. मित्राचा शब्द ते नक्कीच खाली पडू देणार नाहीत, असा टोलाही पवारांनी लगावला.

रोहित पवारांनी पोस्ट केलेला फोटो..

प्रणाली सुधारण्यासाठी ‘व्ही. राधा समिती’

दरम्यान, विद्यार्थ्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका मांडली. औषध निरीक्षक पेपरफुटीचा सखोल तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यापर्यंत नेला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस आहे, चुका लपवण्यात नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, आयोगाच्या कामकाजात सर्वंकष सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण राज्यभर दौरा करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट चर्चा करणार असून, त्यांच्या सूचनांनुसार परीक्षा पद्धतीत पुढील बदल केले जाणार आहेत.

हेही वाचा..

MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: आठवडाभरात सर्व मागण्या मान्य करण्याचे फडणवीसांचे आश्वासन, पेपर पुनर्तपासणीसह SIT चौकशी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालावरून आणि कथित पेपरफुटीवरून आक्रमक झालेल्या MPSC विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेली महत्त्वपूर्ण बैठक यशस्वी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पेपरची पुनर्तपासणी करण्याचे आणि पेपरफुटीच्या प्रकरणाची थेट ‘एसआयटी’ (SIT – विशेष तपास पथक) मार्फत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.