Headlines

BRICS shield; Guarded by 35 thousand soldiers, Akash missiles deployed for air defense, 35 safe routes, Air Force surveillance like Republic Day


  • Marathi News
  • National
  • BRICS Shield; Guarded By 35 Thousand Soldiers, Akash Missiles Deployed For Air Defense, 35 Safe Routes, Air Force Surveillance Like Republic Day

मुकेश कौशिक/मनीष राणा | नवी दिल्ली2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी १२-१३ सप्टेंबरला दिल्लीत पोहोचणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस व निमलष्करी दलाचे ३५ हजार जवान तैनात असतील. यात १०० हून अधिक एनएसजी कमांडोही आहेत. सूत्रांनुसार हवाई दलाने प्रजासत्ताक दिनासारखे सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय केले. आघाडीवरील हवाई तळांवर लढाऊ विमानांची तत्परता वाढवली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राची हवाई सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. एअर डिफेन्समध्ये आकाश क्षेपणास्त्रांसह जमिनीवरून हवेत मारा करणारी शॉर्ट आणि लाँग रेंजची क्षेपणास्त्रेही तैनात आहेत.

मध्य दिल्लीच्या मोक्याच्या ठिकाणी बहुस्तरीय सुरक्षा कवच आहे. येथे अँटी एअरक्राफ्ट गन, अँटी ड्रोन सिस्टीम आणि स्नायपर तैनात आहेत. आयोजन स्थळ भारत मंडपमच्या परिसरात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. काही कॅमेरे वाहनांची नंबर प्लेटही ओळखू शकतात.

दोन नेत्यांचे ताफे मोठे, पुतीन यांची चिलखती कार पोहोचली, जिनपिंगसोबत ४०० प्रतिनिधी

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे ताफे मोठे असतील. एजन्सींना पुतीन व जिनपिंग यांच्या ताफ्यांसोबत रशियन नियंत्रित सुरक्षा, चिनी तांत्रिक आघाडीचा सुरक्षास्तरही सांभाळावा लागेल.

शी जिनपिंग : टीमने पूर्व पाहणी केली, हॉटेलपासून किचनपर्यंत सुरक्षा कवच

जिनपिंग यांच्या दौऱ्यासाठी एअर चायनाच्या बोईंग-७४७ ला महिनाभराच्या तयारीनंतर राष्ट्रपतींचे विमान बनवले जाते. याच्या पुढे बैठक कक्ष, कार्यालय व बेडरूम असतात. त्यांच्यासोबत ४०० सदस्यांचे पथक येऊ शकते. त्यात अधिकारी, प्रोटोकॉल, सुरक्षाआदी असतील. मागील चेन्नई दौऱ्यात त्यांच्या भोजनासाठी चिनी आचारी आणि नियंत्रित स्वयंपाकघर व्यवस्था होती. त्यांच्या बाबतीत हॉटेलची खोलीच नाही, तर स्वयंपाकघरापासून ते गाडी व संचारापर्यंत सर्व सुरक्षा योजनेचा भाग असते. त्यांच्यासाठी ताज पॅलेस हॉटेल आठवडाभरापूर्वीपासून बुक आहे.

व्लादिमीर पुतीन: ‘फ्लाइंग क्रेमलिन’ आणि स्वतःचे किचनही सोबत आणतील

पुतीनसोबत भारतात येणारे ‘फ्लाइंग क्रेमलिन’ आयएल-९६-३००पीयू विमान चालते-फिरते राष्ट्रपती कमांड सेंटर आहे. त्यांच्यासाठी ऑरस सीनेट चिलखती लिमोझिनही आणली आहे. अंतर्गत सुरक्षा एफएसओ सांभाळेल, तर भारतीय एजन्सी बाह्य कवच ठेवतील. अन्नाची वेगळी तपासणी होईल. रशिया आचाऱ्यांचा वापर करेल. पुतीन दिल्लीच्या मौर्या शेरेटन हॉटेलमध्ये थांबतील.

शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या परदेशी पत्रकारांना विशेष भेटपेटी (किट) दिली जाणार आहे. यामध्ये बिहारचा सत्तू आणि मखाना, ओडिशाची प्रसिद्ध कोरापुट कॉफी तसेच गुजरातमधील पारंपारिक हस्तकला वस्तूंचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *