Headlines

पक्षनिष्ठेचे फळ; आमदार नितीन देशमुखांकडे विदर्भातील तीन लोकसभा मतदारसंघांची धुरा:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय; पक्षसंघटना बळकटीकरणावर भर‎



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षसंघटना बळकटीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर अकोला, अमरावती आणि बुलडाणा या विदर्भातील तीन लोकसभ

.

‘मातोश्री’वर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अमरावती, बुलडाणा आणि राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि आव्हाने लक्षात घेता पक्षसंघटना तळागाळात अधिक मजबूत करण्यासाठी विश्वासू नेत्यांवर या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामाला वेग देण्याचे आवाहन केले. “सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असली तरीही संघटना मजबूत करा; येणारा काळ आपलाच आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक समन्वय वाढवण्यावर भर देण्याचा संकल्प व्यक्त या नवीन नियुक्तीमुळे अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत शिवसेना संघटना अधिक सक्रिय करणे, स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढवणे तसेच जनसंपर्क अधिक गतिमान करणे ही मुख्य जबाबदारी आमदार नितीन देशमुख यांच्यावर असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *