![]()
आगामी गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याबरोबरच ‘नो डीजे’ या उपक्रमाच्या अनुषंगाने गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर व पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस व महसूल प्रशासनाने केले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करून स्थानिक प्रशासनाची नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटी सदस्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडली. या वेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास जगताप, तहसीलदार एफ. आर. शेख, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, सार्वजनिक बांधकाम विभाग सहायक कार्यकारी अभियंता विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मंडळांनी मंडप उभारताना वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. याशिवाय आक्षेपार्ह देखावे, बॅनर, होर्डिंग अथवा सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होईल असे साहित्य प्रदर्शित करू नये.
Source link
नो डीजे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा:बार्शीत शांतता कमिटी, गणेशोत्सव मंडळांची बैठक