Headlines

Navnath Ban Targets Rohit Pawar; Slams Aditya & Amit Thackerays Marathi Love


ईडीच्या अधिकाऱ्यांची भरती होत असेल तर संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या पोटात का दुखत आहे.ईडीचे आधाकारी भरती झाले तर तुमचे काही बाहेर पडणार आहे का? बारामती ॲंग्रोमध्ये काही काळं आहे का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तुम्ही काही चुकीच

.

नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठीच्या नावाने राजकारण करायचे आणि महाराष्ट्रगीत सुरू असताना उभे राहण्याची आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना लाज वाटते. गीत सुरू असताना हे गप्पा मारण्यात व्यस्त होते. यांचे मराठीवरचे प्रेम बेगडी आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आदित्य आणि अमित ठाकरेंनी महाराष्ट्राचा स्वाभिमानासाठी पुढे राहू शकत नाही ते केवळ नौटंकी करत आहेत.

लुटीच्या पैशातून उबाठाची गुंतवणूक

नवनाथ बन म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात साधू हत्याकांड झाले त्यांची एसआयटी नेमण्यात आली त्याचे काय झाले? पत्रकारांच्या अटकेबद्दल चौकशी होणार होती असे अनेक प्रश्न आम्हाला विचारता येतील. आम्ही कोणाला पाठिशी घालत नाही. देवेंद्र फडणवीस आरोपींवर कारवाई करतात, पण तुमच्या काळात सर्वांना पाठिशी घालण्यात येत होते. तुम्हाला एसआयटी महत्त्व माहितीच नाही तुम्हाला केवळ एसआयपीच माहिती आहे. तुम्ही मुंबई मनपा लुटून जै पैसे कमावले ते तुम्ही गुंतवणूक करत आहात हे जनतेला माहिती आहे.

तेव्हा राऊत उबाठा सोडतील

नवनाथ बन म्हणाले की, 2028ला खासदारकी गेल्यानंतर संजय राऊत हे उबाठामध्ये राहणार नाहीत. ते काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीमध्ये उबाठाला विलीन करुण घेणार आहेत अशी त्यांची डील झाली आहे. 2039 ला सुद्धा तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. जनता महायुती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि देवाभाऊंच्या सोबत आहे.

मुंबईतील जनतेने तुम्हाला घरी बसवले

नवनाथ बन म्हणाले की, मुंबईमध्ये मनपातील नगरसेवकांना लोकांनी निवडून दिले आहे. त्याच जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे. आता ही मनपा बरखास्त होणार नाही. तुमची कितीही इच्छा असली तरी महापौरपद तुम्हाला मिळणार नाही जनतेने महायुतीला निवडून दिले आहे. आम्ही सेवा करण्यासाठी काम करत असतो तुमच्यासारखे मेवा खाण्यासाठी आम्ही निवडणूक लढवली नाही.

हे ही वृत्त वाचा

मनोज जरांगेंना वाऱ्यावर सोडणं हा अमानुषपणा:संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, नांदेडमध्ये ‘तुमसे ना हो पायेगा’ जनआंदोलन

नांदेड2 तासांपूर्वी

मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे.

सरकारने मनोज जरांगे यांना वाऱ्यावर सोडले असून, त्यांच्याकडे फिरकायचे नाही असे आदेश प्रशासनाला देणे हा अमानुषपणा आणि क्रौर्य आहे, असा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, मराठवाड्यातील रखडलेल्या विकास योजना आणि बोगस कामांचा पंचनामा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज नांदेडमध्ये ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आक्रमक जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. वाचा सविस्तर

2029 मध्ये ‘पुन्हा येण्यासाठी’ ही पूर्वतयारी तर नाही ना?:ED च्या नव्या भरतीवरून रोहित पवारांचा भाजपला टोला

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED मध्ये ॲडिशनल डायरेक्टर आणि जॉईंट डायरेक्टर या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या भरतीचा संदर्भ देत त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून केंद्र सरकारच्या आगामी राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.