मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह ‘सगेसोयरे’ अध्यादेश आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सलग 14वा दिवस पूर्ण झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा कणही न घेतल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. अशा
.
शासनाला दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर, उद्याच्या बैठकीत मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण मार्ग आणि अंतिम तारीख जाहीर केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
घरात बसून टीव्ही पाहू नका; प्रत्यक्ष हजर राहा
आपल्या आवाहनात जरांगे पाटील म्हणाले, “आपल्याला मुंबई आंदोलनाची तारीख कळाली की थेट मुंबईला जाऊ, असा विचार कोणीही करू नका. घरात बसून मोबाईल, यूट्यूब किंवा टीव्हीवर बातम्या बघितल्याने समाज यशस्वी होणार नाही. जर समाज प्रत्यक्ष एकत्र दिसला नाही, तर सरकारपर्यंत चुकीचा संदेश जातो. ही आपल्या लेकराबाळांच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे उद्या 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून बांधवांनी अंतरवालीत येऊन या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार व्हावे.”
कामावर एक दिवस पाणी सोडा, रस्त्यावर येऊन आशीर्वाद द्या
ज्या शेतकरी, नोकरदार किंवा व्यावसायिकांना मुंबईला येणे शक्य होणार नाही, त्यांनी मोर्चाच्या मार्गावर उपस्थित राहावे. “तो मार्ग तुमच्या गावापासून किंवा जिल्ह्यापासून 100-200 किमी लांब असला, तरी एका दिवसाचे काम बुडवून सहकुटुंब त्या रस्त्यावर या आणि जाताना केवळ आशीर्वाद द्या. तुमच्या एका दिवसाच्या त्यागामुळे मराठ्यांच्या शेकडो पिढ्यांचे कल्याण होणार आहे,” असे जरांगे म्हणाले.
मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची सोय
मुंबईच्या मार्गावर ज्या ज्या शहरात किंवा गावात मुक्काम पडेल, त्या भागातील मराठा बांधवांनी एकत्र येऊन आंदोलकांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करावी. मोर्चा पुढे निघेपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वतः तिथे उपस्थित राहून सेवा करावी.
दुष्काळामुळे प्रत्येकावर आर्थिक भार नको; वर्गणीतून गाड्या करा
राज्यात पाऊस-पाणी नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य अडचणीत आहेत, याची जाणीव करून देत ते म्हणाले, “एकाच व्यक्तीवर आर्थिक ताण देऊ नका. संपूर्ण गावाने एकत्र येऊन वर्गणी काढावी, गाड्या कराव्यात आणि मुंबईला जाणाऱ्या तरुणांसाठी सुका खाऊ बांधून द्यावा. ज्यांची परिस्थिती नाजूक आहे, त्यांनी गावातच राहावे.”
महिलांची घालमेल आणि सणासुदीचे दिवस
महिलांनीही आंदोलनात सहभागी होण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, सध्या सणासुदीचे दिवस आणि घराची जबाबदारी असल्याने महिलांनी स्वतःच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे त्यांनी सुचवले.
परवानगी दिली तरी जाणार, नाही दिली तरी जाणार!
मुंबई आंदोलनाच्या परवानगीबाबत बोलताना जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले. ते म्हणाले,
“आम्ही कायद्याला मानतो, संविधानाला मानतो म्हणून सरकारकडे रीतसर परवानगीचा अर्ज केला आहे. ज्या मराठ्यांच्या जीवावर सरकार सत्तेत बसले आहे, ते जर भावनाशून्य नसतील, तर परवानगी नाकारणार नाहीत. परंतु, सरकारने परवानगी दिली तरी आम्ही मुंबईला जाणार आणि नाही दिली तरीही मुंबईत उपोषणाला बसणार! सरकार न्याय देत नसले, तरी देशातील न्यायदेवता गोरगरिबांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

मुंबईत मुलांना त्रास झाला, तर अख्खा महाराष्ट्र ठप्प करू!
सरकारला कडक शब्दांत इशारा देताना जरांगे म्हणाले की, “आता सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. जर आमच्या पोरांना मुंबईत अडवले किंवा काही त्रास दिला, तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील मराठा समाजाने रस्त्यावर उतरून शांततेत ठिय्या मांडावा. एका एका तालुक्यात आपण लाखापेक्षा कमी नाही. त्यानंतर राज्य बंद पडले किंवा रस्ते अडवले गेले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.”
हैदराबाद गॅझेटियरचा दाखला देत सरकारवर निशाणा
सरकारच्या दुटप्पी धोरणावर टीका करताना त्यांनी नमूद केले की, “९ सप्टेंबर रोजी सरकारने वाणी, हिंदू वैश्यवाणी यांच्या संदर्भातील शासन निर्णय (GR) तातडीने काढला. मग मराठ्यांच्या वेळीच चालढकल का? मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा हा कुणबी आहे हे सिद्ध झालेले असताना, केवळ मराठ्यांवरच हा अन्याय का केला जात आहे? हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही.”
अंतरवालीत हालचालींना वेग; उद्या होणार अंतिम निर्णय
आंतरवाली सराटीमध्ये आधीपासूनच शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा रथ आणि प्रसारमाध्यमांचे ओबी व्हॅन दाखल झाले आहेत. उद्याच्या बैठकीत राज्यभरातून येणाऱ्या प्रतिनिधींशी चर्चा करून मुंबई कूचची नेमकी तारीख आणि वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या अंतरवालीतील बैठकीकडे लागले आहे.
——–
हेही वाचा…
जरांगे समाजसेवक, त्यांना मरण्यासाठी वाऱ्यावर सोडणार का?: जरांगेंना हात लावला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल- अभिजीत दिपके

सोनम वांगचूक यांना जसे उचलण्यात आले होते तसा प्रयत्न सुद्धा सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतीमध्ये करू नये हा महाराष्ट्र आहे इथे हे चालणार नाही हे मला सांगण्याची गरज नाही, मनोज जरांगे पाटील खूप मोठे आहेत त्यांना जर हात लावला तर अख्खा महाराष्ट्र इथे येईल, असा इशारा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
आंदोलनाने मराठा समाजाला नवीन लाभ मिळणे कठीण: SEBC टिकवणे हेच हिताचे- डॉ. बाळासाहेब सराटे

आंदोलन गावात करा की मुंबईत करा, तूर्तास तरी आंदोलनाने मराठा समाजाला कोणताही जास्तीचा किंवा नवीन लाभ मिळणार नाही. सरकारने काय दिले आणि आंदोलनाने काय मिळाले याचा विचार करण्यात समाजाची दोन वर्षे गेली. आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण गरजूंना आरक्षणापर्यंत पोहोचवणे त्याहून जास्त महत्त्वाचे आहे, असे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी