Headlines

Nagpur SBI Bank Robbery; Thief Arrested Within 30 Minutes


नागपूरच्या सक्करदरा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत अगदी फिल्मी स्टाईलने दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामान्य ग्राहकाच्या वेशात आलेल्या एका तरुणाने अचानक बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकली आणि क

.

नेमके काय घडले?

सक्करदरा परिसरातील वर्दळीच्या एसबीआय शाखेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. यावेळी सुरज भोजराज बोरकर (वय 28) हा तरुण एक सामान्य ग्राहक बनून बँकेत शिरला. कॅश काऊंटरवर जाताच त्याने खिशातून लाल मिरचीची पूड काढली आणि क्षणाचाही विलंब न लावता समोर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत ती भिरकावली. यामुळे बँकेत एकच गोंधळ उडाला आणि कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच त्याने कॅश काऊंटरवरील 4 लाख रुपयांची रोकड (काही रिपोर्ट्सनुसार 4.53 लाख) हिसकावली आणि बँकेबाहेर पळ काढला.

पाहा घटनेची दृश्ये

आरोपीने बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली.

आरोपीने बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली.

बँकेतील रोख रक्कम चोरण्यासाठी डेस्कवरून केबिनमध्ये शिरला.

बँकेतील रोख रक्कम चोरण्यासाठी डेस्कवरून केबिनमध्ये शिरला.

पैसे चोरून आरोपीने पोबारा केला.

पैसे चोरून आरोपीने पोबारा केला.

कर्मचाऱ्यांकडून पाठलाग आणि पोलिसांची तत्परता

डोळ्यांची जळजळ होत असतानाही बँकेचे काही धाडसी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकाने तत्काळ या दरोडेखोराचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला तो गर्दीचा फायदा घेत निसटला. मात्र, बँकेने त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष आणि सक्करदरा पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बँकेतील आणि बाहेरचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून आरोपीचा पळण्याचा मार्ग निश्चित केला.

बँकेपासून अवघ्या 1 किलोमीटरवर जेरबंद

पोलिसांनी तत्परतेने परिसरात नाकेबंदी केली आणि पेट्रोलिंग पथकांना हाय-अलर्ट दिला. बँकेचे कर्मचारी आणि जवळच असलेल्या पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नाने बँकेपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर पळत असलेल्या सुरजला अवघ्या 30 मिनिटांत घेरण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून लुटलेली संपूर्ण 4 लाखांची रक्कम सुरक्षितपणे हस्तगत केली आहे. पोलिसांच्या या अत्यंत वेगवान कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोण आहे आरोपी आणि काय आहे कारण?

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सुरज बोरकर हा उच्चशिक्षित असून तो बी.एस्सी (B.Sc.) पदवीधर आहे. मात्र, सध्या तो बेरोजगार असल्याने याच बेरोजगारीच्या नैराश्यातून आणि पैशांच्या गरजेतून त्याने हे गंभीर पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

या थरारक घटनेचा मोठा भाग बँकेत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. आरोपी ग्राहकाच्या वेशात बँकेत येतो, कॅश काउंटरजवळ जातो, अचानक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकतो आणि त्यानंतर रोकड घेऊन बाहेर पडतो, अशा त्याच्या हालचाली तपास यंत्रणेला सीसीटीव्ही फुटेजमधून समजल्या आहेत.

दिवसाढवळ्या आणि बँकेत ग्राहकांची वर्दळ असतानाही आरोपीने अशा प्रकारे लुटीचा प्रयत्न केल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, घटना घडल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि पोलिसांनी केलेली जलद कारवाई यामुळे आरोपीला पळून जाण्यात यश आले नाही. सध्या सक्करदरा पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, या गुन्ह्यामागील नेमका हेतू, त्याने बँकेची पूर्वतयारी केली होती का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.

——–

ही बातमीदेखील वाचा…

भंडाऱ्यात भीषण अपघात: ट्रक-पिकअपच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश, अनेक जण जखमी

भंडारा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक येथील एका ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.