Headlines

थरार:बहिणीशी लग्न लावून देण्यास नकार; दुकानात घुसून भावाचा भोसकून खून, संभाजीनगरातील घटना, आरोपी गेले फुलंब्रीला पळून




लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून हर्सूल परिसरातील ‘लाइफलाइन’ मेडिकल शॉपचे चालक फैसल कादर शेख (२२, रा.उमर कॉलनी) यांची दुकानात घुसून चाकू खुपसून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (११ सप्टेंबर) दुपारी १२.३० ते १२.५७ या दरम्यान हर्सूल येथील पटेल लॉन्सजवळील आयशा मंजिल परिसरात घडली. यात रेहान अमीन पटेल (२५, रा. करीमनगर) व समीर रईस शेख यांना अटक केल्याची माहिती हर्सूल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. आरोपी रेहानचे काही महिन्यांपूर्वी फैसल यांच्या बहिणीसाठी लग्नाचे स्थळ आले होते. मात्र, कौटुंबिक कारणास्तव त्याला नकार दिला होता. यावरून आरोपी रेहान हा फैसल व त्यांच्या कुटुंबावर राग धरून होता. तो वारंवार मेडिकल व घरासमोर बुलेटचा मोठा आवाज काढून त्रास देत असे. शुक्रवारी दुपारी रेहान आपल्या साथीदारांसह दुकानात घुसला. तेथे झालेल्या वादानंतर रेहानने फैसलच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर रक्तस्राव होत असल्याने त्याला तातडीने घाटीत दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उपयुक्त रत्नाकर नवले, सहायक निरीक्षक सचिन सदाफुले, उपनिरीक्षक सुभाष शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांचा आक्रोश, आरोपीच्या अटकेची मागणी : “आमच्या निष्पाप मुलासोबत हे का घडले? सर्व दोषींना तात्काळ अटक करा,’ असा आक्रोश करत नातेवाइकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मृत फैसलच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे. इनसाइड स्टोरी: दोन दिवसापूर्वी आगीची चर्चा, आरोपीवर संशय दोन दिवसांपूर्वी फैसलच्या मेडिकलला आग लागली होती. त्यामुळे परिसरात रेहान व साथीदारांनीच आग लावल्याची चर्चा पसरली होती. त्यामुळे आरोपींनी थेट त्यांच्या मेडिकलमध्ये जात राडा करण्यास सुरुवात केली. त्यास विरोध करत असतानाच त्यांनी चाकू फिरवण्यास सुरुवात केली आणि थेट त्यांच्या पोटात खुपसला. यात चाकू फैसलच्या पोटात अडकला तर त्याची मूठ घटनास्थळी पडलेली होती. दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपी फुलंब्रीला नातेवाइकांच्या घरी पळून गेले होते. मात्र पोलिसांनी या घटनेच्या काही तासांतच ३ पथके गठित करून आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *