![]()
गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे फर्दापूर परिसरातील पिके करपून जाण्याच्या मार्गावर असतानाच, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाच्या आगमनाने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे वाळणाऱ्या पिकांना नवीन जीवनदान मिळाले असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ऑगस्टअखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाचा मोठा खंड पडल्याने तीव्र उन्हामुळे कापूस, मका, सोयाबीन आणि मिरचीची पिके पूर्णपणे संकटात सापडली होती. हाताशी आलेले पीक वाया जाते की काय, अशा भीतीने शेतकरी वरुणराजाला साकडे घालत होता.
Source link
फर्दापूर:परिसरामध्ये 20 दिवसांनी बरसला पाऊस