Headlines

संतापजनक! धाराशिवमध्ये रेशनच्या तांदळात सापडली चक्क दातांची कवळी:लोहारा तालुक्यातील जेवळी येथील धक्कादायक घटना




धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी (सांगाडा) सापडल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या खळबळजनक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांना वाटप केल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या दर्जावर आणि सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेवळी येथील भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी शुक्रवारी ‘गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार’ या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य आणले होते. सायंकाळी त्यांच्या सुनेने भात करण्यासाठी पिशवीतील तांदूळ साफ करण्यासाठी चाळणीत घेतले असता, त्यात चक्क 6 ते 7 दातांची कवळी आढळून आली. अन्नात असा घृणास्पद प्रकार आढळल्याने बिराजदार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुजलेल्या अवस्थेत आढळून आले दात तांदळात आढळून आलेली ही दातांची कवळी काहीशी कुजलेल्या अवस्थेत आहे. हे दात नेमके मानवी आहेत की एखाद्या प्राण्याचे, याची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही. सुदैवाने, अन्न शिजवण्यापूर्वीच हा किळसवाणा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप या धक्कादायक घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जेवळी आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. गरिबांसाठी वाटप केल्या जाणाऱ्या रेशनच्या धान्यात असा जीवघेणा हलगर्जीपणा कसा काय होऊ शकतो, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित रेशन दुकानदार आणि धान्य पुरवठादारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *