Headlines

बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलासाठी राजीनामा दिला, फडणवीस तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?:महिला आरक्षण अन् डिलिमीटेशन वेगळे असताना एकच का सांगितले?- सुषमा अंधारे




देवेंद्र फडणवीस महात्मा फुलेंच्या गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड यांचे जाहीर वाचन रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात करताल का? मोहन भागवत यांचे या पुस्तकावर काय मत आहे हे फडणवीसांनी जाणून घ्यावे, असे उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर डिलिमीटेशन आणि महिला आरक्षण विधेयक वेगळे असताना ते एकच आहे असे का सांगितले. सुषमा अंधारे म्हणाले की, डिलिमीटेशन फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का? सुषमा अंधारे म्हणाले की, गोध्रा दंगलीवेळी एखादं बाळ खडकावर आपटून मारले जात असताना ज्यांनी त्यांचे रिपोर्टिंग केले आहे, किंवा ते वाचले आहे त्यांना कळेल भ्रूणहत्या काय असते. 1951 मध्ये भ्रूणहत्या झाली ती कोणी केली? हिंदू कोडबिल मांडले तेव्हा ती कोणी केली? ही भ्रूणहत्या रा.स्व. संघाच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बिल मंजूर होत नसल्याने पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. अंधारेंचे लाव रे तो व्हिडिओ सुषमा अंधारे म्हणाले की, 2023 मध्ये महिला आरक्षणाचे बिल पास झाले असताना अमित शहा यांनी संसदेत काय भाषण केले याचा व्हिडिओ दाखवला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणाचा व्हिडिओसुद्धा दाखवला ज्यात मोदींनी 33 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहे, असे सांगितल्याचे दिसत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाचा देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला असेल म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. फडणवीसांनी त्या ट्विटवर बोलावे सुषमा अंधारे म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक 2026 मध्ये मंजूर होणार होते असे जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर 2023 मध्ये काय ट्विट होते हे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगावे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, लोकसभेने महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजुने 454 मते पडली लोकसभा, आणि विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट वाचून दाखवले मग हे ट्विट तेव्हा का केले होते हे फडणवीसांनी सांगावे. असेच एक ट्विट अमित शहा यांनी सुद्धा केले आहे. त्यांनी दोन ट्विट केले यामध्ये एक विधेयक मंजूर करण्यापूर्वी आणि एक विधेयक मंजूर झाल्यानंतर केले आहे. फडणवीस यांनी यावर सुद्धा बोलले पाहिजे. त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत सुद्धा हे विधेयक पास झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी केल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *