Headlines

MPSC आंदोलनप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल:परवानगी रद्द होऊनही आंदोलन सुरू ठेवल्याने कारवाई, रोहित पवारांचे नाव नाही




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनावर आता पोलिसांनी कायदेशीर बडगा उगारला आहे. परवानगी रद्द झाल्यानंतरही बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 15 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनात सक्रिय सहभाग असणारे आमदार रोहित पवार यांचे नाव या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. या 15 जणांवर झाली कारवाई पोलिसांनी प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियांका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभुळकर आणि साहेबराव क्षीरसागर या १५ जणांवर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. परवानगी नसताना आंदोलन करणे, चिथावणीखोर वक्तव्ये करणे आणि वाहतुकीला अडथळा आणणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर परवानगी झाली होती रद्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी प्रतिनिधींना एस. एम. जोशी पुलाजवळ २ ऑक्टोबर रोजी सशर्त आंदोलन करण्यासाठी २६ सप्टेंबरला परवानगी देण्यात आली होती. मात्र, ३० सप्टेंबर रोजी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्या. त्यानंतर प्रतिनिधींनी २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित करत असल्याचे लेखी पत्र पोलीस आयुक्तांना दिले होते, ज्यामुळे आंदोलनाची पूर्वीची परवानगी आपोआप रद्द झाली होती. विनापरवानगी आंदोलन आणि पोलिसांचा इशारा परवानगी रद्द झालेली असतानाही आंदोलकांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा नव्याने परवानगी न घेता पुन्हा आंदोलन सुरू केले. सलग आठ दिवस रस्ता अडवून धरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहतुकीचा मुक्त प्रवाह कायम ठेवणे ही राज्याची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी आंदोलकांना नोटीस बजावून आंदोलन मागे घेण्यास किंवा सुचविलेल्या पर्यायी जागेवर जाण्यास सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या या नोटिशीकडे दुर्लक्ष करून रस्ता अडवून आंदोलन सुरूच ठेवल्याने अखेर विविध कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. —————- ही बातमी पण वाचा.. MPSC आंदोलनाचा नववा दिवस:प्रकृती बिघडल्याने 3 विद्यार्थ्यांनी सोडलं उपोषण, रोहित पवार म्हणाले- अध्यक्षांच्या विकेटशिवाय आंदोलनाची सांगता नाही पुण्यात एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून हक्कांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काही विद्यार्थी अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे उपोषणाला बसलेल्या सातपैकी तीन विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *