![]()
मोबाइल खरेदीसाठी दहावीतील दोन अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे अडीच तोळे सोने जप्त केले. संतोष बिराजदार (रा. सनथ नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका मुलाचे बिराजदार यांच्या घरी येणे-जाणे होते. कपाटाची चावी पायपुसणीखाली असल्याचे त्याला माहीत होते. त्याने घर उघडून कपाटाचे लॉकर तोडले आणि नेकलेस, अंगठी व कर्णफुले असा ३ लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीनंतर पुन्हा कुलूप लावून चावी पूर्ववत पायपुसणीखाली ठेवून दिली. आजोबांनी पाहिले अन् चोरीचा उलगडा झाला घटना उघडकीस आल्यानंतर बिराजदार पोलिसांत गेले. तपासादरम्यान घरातील आजोबांनी शेजारील मुलगा घरी आला होता, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. मोबाइल खरेदी करण्यासाठी त्याने हा पहिलाच गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा म्हणाले.
Source link
सोलापुरात मोबाइलसाठी दहावीतील विद्यार्थ्यांनीे चाेरले 3 लाखांचे दागिने:पायपुसणीखाली ठेवलेली कपाटाची चावी घेऊन केली चाेरी