Headlines

वरखेड परिसरात धुडगूस घालणारा बिबट्या जेरबंद:महिनाभरापासून दहशत, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा‎




तालुक्यातील वरखेड वाघ वस्ती परिसरात गेल्या महिनाभरापासून धुडगूस घालून पशुधनावर हल्ले करणाऱ्या बिबट्याला वन विभागाने शुक्रवारी रात्री पिंजरा लावून जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे समजताच गेल्या अनेक दिवसांपासून भीतीखाली जगणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. वरखेड परिसरातील शेतवस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्याने घबराट पसरली होती. शेतकरी दिलीप वाघ यांनी पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. उपसभापती हिवाळे यांनी तात्काळ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची आक्रमक मागणी केली. त्यानुसार पिंजरा लावण्यात आला. शनिवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पसरताच पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. माहिती मिळताच वनपाल ए. के. पाटील, वनरक्षक के. व्ही. बमनावत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतात जाण्यास घाबरणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *