Headlines

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल:आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा क्विक रिस्पॉन्स, 100 हून अधिक अधिकारी तैनात‎




आगामी सण-उत्सव आणि ‘गणेशोत्सव २०२६’ शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावेत तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस दल पूर्णपणे सतर्क झाले आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा अनुचित प्रसंगी पोलीस दल घटनास्थळी किती वेळेत आणि कसे पोहोचते, याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निदा हायस्कूल परिसरात ‘मॉकड्रील’ राबविण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त (परिमंडळ-१) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) श्याम घुगे, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे यांच्यासह एसीपी निलेश ब्राम्हणे, एसीपी नयन आलुरकर व एसीपी संजय खताळे हे प्रमुख अधिकारी घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित होते. याशिवाय गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा तसेच इतर विशेष शाखांचे प्रभारी अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत ७७ पोलिस अंमलदार, शीघ्र कृती दलाचे १० जवान आणि दंगा नियंत्रण पथकाचे ३४ जवान असा १०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राहणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *