![]()
मोबाईलच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला आपल्या उच्च कोटीच्या सांस्कृतिक परंपरेची जाणीव व्हावी, मुलांनी काही तास का होईना मोबाईलपासून दूर राहून पारंपरिक सणाचा आनंद घ्यावा, या संकल्पनेतून श्री संकट मोचन बहुउद्देशीय कला दर्पण म्युझिकल योगा ग्रुप मंडळाच्य
.
कार्यक्रमाची संकल्पना अॅड. आशिष हाडके व सविता हाडके यांची होती. यावेळी संकट मोचन बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष विनोद मोहिते, सचिव किशोर कोठडे, कोषाध्यक्ष राधेश्याम शुक्ला, राजेभाऊ साबळे, आशिष कराळे, सोनवणे, महिला प्रतिनिधी त्रिशला खैर, तसेच मंडळाचे इतर पदाधिकारी व योगा ग्रुपचे सभासद उपस्थित होते. तान्हा पोळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी आणलेल्या मातीच्या बैलांची पूजा कोषाध्यक्ष राधेश्याम शुक्ला व तेजस्विता शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणलेल्या तान्हा पोळ्याच्या बैलांचे परीक्षण करण्यात आले. परीक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून महेंद्र खैर व श्रीमती बुरघाटे यांनी काम पाहिले. उत्कृष्ट बैल व देखावे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची तीन बक्षिसे देण्यात आली.
दोन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. ही बक्षिसे मंडळाच्या सभासदांच्या सहकार्याने, तसेच राधेश्याम शुक्ला यांच्यावतीने देण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकट मोचन बहुउद्देशीय मंडळ व योगा ग्रुपच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. पारंपरिक सणाच्या माध्यमातून नव्या पिढीला संस्कृतीशी जोडणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
संस्कृतीची ओढ जपणारा उपक्रम विद्यार्थ्यांनी मातीपासून तयार केलेल्या बैलांच्या आकर्षक प्रतिकृती व सुंदर देखावे साकारले. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये रमलेल्या मुलांना प्रत्यक्ष मातीशी जोडत पारंपरिक संस्कृतीचा अनुभव देण्याचा हा उपक्रम ठरला. मुलांच्या हातात काही तास मोबाईलऐवजी मातीचा बैल यावा. मनात आपल्या संस्कृतीची ओढ निर्माण व्हावी. हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.