![]()
‘इज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देणे, वितरण व वाणिज्यिक हानी कमी करणे, वितरित केलेल्या वीज बिलांची १०० टक्के वसूली करणे, या त्रिसूत्रीवर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी काम करावे, असे स्पष्ट निर्देश महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी दिले. अकोला येथील विद्युत भवनमध्ये आयोजित अकोला परिमंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंते राजेश घाटोळे (अकोला), धनंजय अहेर (बुलडाणा), संदीप दरवडे (वाशिम), दीपक सोनोने (पायाभूत आराखडा) यांच्यासह परिमंडळातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख, उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) उपस्थित होते. धनंजय औंढेकर पुढे म्हणाले की, ग्राहकांना ‘शून्य व्यत्यय’ वीजपुरवठा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे शोधावीत. त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात. कृषी ग्राहकांना दिवसा अखंडित वीज देण्यासाठी फिडर सेपरेशनच्या कामांना गती द्यावी. मिश्र वाहिन्यांवरील ग्राहकांसाठी फिडरला एसडीटी बसवावे. वीज ग्राहकांना अचूक, वापरानुसारच बिल गेले पाहिजे. रिडिंग न होणारे अथवा नादुरुस्त (फॉल्टी) मीटर त्वरित बदलावेत. त्याजागी स्मार्ट मीटर लावावेत. ग्राहकांमधील गैरसमज दूर करावेत. नवीन वीज जोडण्या महावितरणच्या ‘एसओपी’नुसार वेळेत द्याव्यात. कामात कोणतीही हयगय अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. परिमंडळाची गळती रोखण्यासाठी १०० टक्के बिल वसूली आवश्यक असून, बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वीज चोरी रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम तीव्र करण्यात यावी. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर असून ते थकबाकीमुळे ‘ऑटो डिस्कनेक्ट’ झाले आहेत, परंतु तरीही वीज वापर सुरू आहे, अशा संशयित ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी करून चोरी आढळल्यास कारवाई आदेश संचालक औंढेकर यांनी दिले. वीज चोरीविरुद्ध मोहीम तीव्र करण्यावर भर
Source link
ग्राहक सेवेला प्राधान्य द्यावे- औंढेकर:संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश, अकोल्यात महावितरणची बैठक