![]()
येथील रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ यंदा आपल्या महोत्सवाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना अमरावतीतच प्रत्यक्ष धामाचे पुण्य लाभावे. बद्रीनाथचे पावन दर्शन घडावे. या संकल्पनेतून यंद
.
नयनरम्य बद्रीनाथ मंदिराच्या देखाव्यासोबतच प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या प्रतिरूपातील सहा फुटांची श्रींची विलोभनीय मूर्ती यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी श्रींच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाला सामाजिक तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची जोड देत मंडळाच्या वतीने वृक्षारोपण मोहीमही राबविण्यात येणार आहे. उत्सवातील सांस्कृतिक उत्साह द्विगुणित करण्यासाठी रामराज्य ढोल पथकाचा सहभाग राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
दहाही दिवस आरोग्य तपासणी शिबिर मंडळाच्या वतीने १० दिवसीय लोकोपयोगी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नामांकित अस्थिरोग व कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान कोणताही गंभीर आजार असलेला रुग्ण आढळल्यास त्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच आरोग्यसेवेचा सामाजिक संदेशही दिला जाणार आहे.
रामराज्य ढोल वादक पथकाची मानवंदना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी रामराज्य ढोल वादक पथक सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पथकाच्या वतीने श्री गणरायाला विशेष मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी ‘शिवमुद्रा’ तालासह शहरात अत्यंत युनिक ठरलेला १७ मिनिटांचा विशेष आरंभ ताल सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती रामराज्य ढोल वादक पथकाचे प्रमुख पवन शर्मा यांनी दिली.