Headlines

सांगळूदकर महाविद्यालयात आरोग्य,‎पोषणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती‎:साखरयुक्त पेये अतिसेवन टाळून घरगुती, पोषणमूल्ययुक्त आहाराला प्राधान्य द्या



दर्यापुर येथील जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभागाच्यावतीने प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पोषण दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त रत्नाबाई राठी हायस्कूल, येथील विद्यार्थ्यांसाठी ‘किशोरवयीन मुलांचे आह

.

यावेळी गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योत्सना पुसाटे यांनी विद्यार्थ्यांना किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक विकासासाठी संतुलित आणि पोषणमुल्ययुक्त आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. आहारातील प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे व खनिजे यांची आवश्यकता स्पष्ट करताना किशोरवयीन मुलांनी नियमित व सकस आहार घेणे आवश्यक असल्याचे प्रा‌.डॉ.पुसाटे यांनी सांगितले. तसेच जंक फूड, फास्ट फूड, अतिरिक्त साखरयुक्त पेये यांचे अतिसेवन टाळून घरगुती व पोषणमूल्ययुक्त आहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. योग्य पोषण ही निरोगी शरीराचीच नव्हे, तर सक्षम मनाची आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे, असा संदेशही डॉ. पुसाटे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नाबाई राठी हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप नवरे होते. अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी दैनंदिन जीवनातील आहाराच्या सवयी, स्वच्छता, व्यायाम, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचा किशोरवयीन आरोग्यावर होणारा परिणाम आदी मुद्द्यांची मांडणी केली. कार्यक्रमाचे संचालन प्रिया दांगटे यांनी केले, तर मनिषा रोकडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वंदना ताथोड, गृहअर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थीनी तसेच रत्नाबाई राठी हायस्कूलचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहार, पोषण,आरोग्यदायी जीवनशैली आणि किशोरवयीन आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *