![]()
सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये 19 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर बारामती आणि त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अविष्कार अमोल ढोले असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविष्कार हा शिक्षणासाठी सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. शनिवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास त्याने राहत्या ठिकाणी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. घटनेनंतर त्याला तातडीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. प्रेमसंबंधातून मानसिक तणाव? प्राथमिक पोलिस तपासात अविष्कारचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर अविष्कार मानसिक तणावात होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेमागील नेमके कारण अद्याप तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. दरम्यान, अविष्कारकडे पिस्तुल कसे आले, त्याने ते कुठून मिळवले आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत. या प्रकरणी सुजित रवी घोडके यांनी पोलिसांना खबर दिली असून, त्यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रजिस्टर क्रमांक 85/2026 अंतर्गत BNSS कलम 194 नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा… विवाह संकेतस्थळावर ओळखीतून तरुणीची 28 लाखांची फसवणूक:आरोपीने तुर्कीतील अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळले; गुन्हा दाखल पुणे शहरात विवाह संकेतस्थळावर ओळखीतून एका तरुणीची २८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून पैसे उकळले. या प्रकरणी फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
Source link
19 वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत केली आत्महत्या:महिलेसोबतचे प्रेमप्रकरण भोवले, पतीला समजताच उचलले टोकाचे पाऊल