Headlines

मंगेश ससाणे यांच्या अटकेचा ओबीसी समाजातर्फे निषेध:जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत कारवाईची मागणी




अमरावती येथे ओबीसी जनमोर्चाने ओबीसी समाजाचे नेते मंगेश ससाणे यांच्या अटकेचा निषेध केला. अंतरवाली सराटी येथे ससाणे यांना अटक करण्यात आली होती. ओबीसी जनमोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात ससाणे यांच्या अटकेबाबत आणि या प्रकरणातील कायदेशीर मुद्द्यांवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. यावेळी ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी सविता पेटकर, चंद्रशेखर देशमुख, सुरज पवार, विलास पवार, संजय वाघुळे, विजय सावरकर, नारायण सांडे, शाह कयूम शाह, मधुर जाधव, राजेंद्र हाडोळे, राजीव भेले, राजेंद्र जढाळे, प्रभाकर झगडे, हेमंत भगत, प्रा. रुपेश फसाटे, तुषार वाढणकर, प्रकाश मानकर, पंकज जांभळे हे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *