सरकारचे इतके मंत्री मान वाकवून मनोज जरांगेंकडे जातात, त्यांची मान कशी तुटत नाही? पाळीव प्राण्याला लाजवेल अशा प्रकारे मान वाकवत मंत्री जातात, त्यामुळे जरांगे पाटलांना आपण बादशहा झाल्यासारखे वाटते. सरकार झुकती है, झुकानेवाला चाहिये अशी सध्याची परिस्थित
.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात कधी नव्हे अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांमध्ये पाणीसाठा नसून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राज्य सरकारने तातडीने विशेष पॅकेज आणि आपत्कालीन आराखडा जाहीर करावा. यासंदर्भात राज्यपालांना पत्र सुद्धा पाठवले आहे. शेतकऱ्यांसाठी पीककर्ज माफी, व्याजात सूट, पीकविमा भरपाईची जलद प्रक्रिया आणि पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करावे. गणरायाने या दुष्काळातून बळीराजाला वाचवावे आणि सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी, असे साकडेही त्यांनी घातले.
ओबीसी समाज मोठ्या संकटात
विजय वडेट्टीवार म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात मराठा आंदोलक मुंबईत आल्यास नक्कीच मोठी गर्दी होईल. हे आंदोलन सरकार कसे हाताळते, हा त्यांचा विषय आहे. परंतु, सरकारने ओबीसी विरुद्ध हिंदू असा वाद निर्माण करण्याचे पाप केले आहे. आज ओबीसी समाज मोठ्या संकटात आहे, शासन त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. नोकऱ्यांमध्ये 80 टक्के लोकसंख्या असलेल्या घटकाला अवघ्या 15 टक्के जागा मिळत आहेत.
संविधानाचे नाव घेण्याची सत्ताधाऱ्यांची लायकी नाही
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे मंत्री ‘हिंदूकडूनच सामान विकत घ्या’ असे बोलतात. या मंत्र्यांना स्वतःला हनुमान चालीसा म्हणता येते का? संविधानावर हे बोलत नाहीत आणि संविधानाचे नाव घेण्याची यांची लायकीही नाही. केंद्र असो की राज्य सरकार, उद्योगपतींचे चोचले पुरवण्यात व्यस्त असून सर्वसामान्यांकडून त्यांच्या काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत.
हे ही वृत्त वाचा
समोरचा हिंदू नसेल तर सामान घेऊ नका:आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित, मगच इतर, हिंदूंना त्रास दिल्यास तांडव करू- नीतेश राणे

समोरचा व्यक्ती जर हिंदू असतील तरच त्यांच्याकडून सामान घेतले पाहिजे. समोरचा व्यक्ती जर हिंदू नसेल टीका लावत नसेल, त्याला हनुमान चालीसा किंवा गणपती बाप्पांची आरती आली पाहिजे तरच मी त्यांच्याकडून वस्तू विकत घेईल ही भूमिका प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे, असे भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारमध्ये पहिले हिंदूंचे हित पाहिले जाणार मग सर्वांना मोजणार हे आमच्या डोक्यात स्पष्ट आहे. कोणीही वळवळ करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. वाचा सविस्तर