![]()
गणेशोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, गणेश मंडळांच्या सदस्यांनी परवानगी, सदस्यांची तपशीलवार माहिती, देखाव्याची माहिती, मिरवणुकीचा तपशील आदी बाबींची कायदेशीर पूर्तता करून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच ‘माझे मंडळ, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवून काळजी घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केले. तालुक्यातील ७१ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली असून, १३५ अधिकृत मंडळांनी गणरायाची मनोभावे स्थापना केली. यावेळी पोलिस निरीक्षक देशमुख यांनी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांसाठी असलेली आदर्श आचारसंहिता तपशीलवार समजावून सांगितली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी काळजी घ्यावी व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव काळात अखंडित वीजपुरवठा ठेवावा, मंडळांची श्रींच्या स्थापनेची जागा उंच असावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, रस्त्यावर अतिक्रमण करून मंडळ उभारणाऱ्यांनी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावेत, मिरवणूक व देखावे पाहण्यासाठी वेगवेगळी वेळ ठरवावी, तसेच स्वयंसेवकांनी मंडळासमोरील गर्दी कमी करावी. आवाजाचा डेसिबेल कमी व नियमात ठेवावा, आदी बाबी त्यांनी स्पष्ट केल्या. बहुतांश मंडळांनी याही वर्षी गणेशोत्सवाची गुलालविरहित मिरवणूक काढण्याचा संकल्प केला आहे. मंडळे व बंदोबस्त असा कळवण पोलिस स्टेशन हद्दीत : एक गाव एक गणपती : ३७, गणेश मंडळे : ७०, लहान : २०, मोठे : ५०, कळवण शहरातील मंडळे : एकूण : ३३, लहान : १३, मोठे : २०, अभोणा पोलिस स्टेशन हद्दीत : एक गाव एक गणपती : ३४, गणेश मंडळे : ६५, लहान : ३५, मोठे : ३०, गणेशोत्सव कालावधीतील पोलिस बंदोबस्त :५ अधिकारी, ४५ पोलिस, ६० होमगार्ड, ८० अकॅडमी विद्यार्थी स्वयंसेवक.
Source link
कळवणमध्ये 71 गावांत ‘एक गाव एक गणपती’:135 अधिकृत मंडळांकडून गणरायाची स्थापना; गुलालविरहित मिरवणुकीचा संकल्प