![]()
येथील नगर परिषद कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणपतीची स्थापना उत्साहात करण्यात आली. नगर परिषद कर्मचाऱ्यांतर्फे गेल्या ३० वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. मात्र, यंदाचा उत्सव एका वेगळ्या कारणाने विशेष ठरला.नगराध्यक्ष अविनाश गायगोले यां
.
या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थापनेच्यावेळी विशेष करून सर्व जाती-धर्माचे नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी महाआरती केली.नगराध्यक्ष अविनाश गायगोले,उपनगराध्यक्ष प्रियंका मालठाणे,नगरसेवक मनिष मेन, सुयोग खाडे,रामन्य आवंडकर,पंकज मोदी, ताज मोहम्मद, मो.कलीम मो.कलाम, शोएब खाँ. युसूफ खाँ.,अकबर शहा, आशिक अंन्सारी, रहिम शहा, डॉ.विलास कविटकर, प्रदीप देशमुख,शंकर मालठाणे,राजू कुरेशी,अजय पसारी, सुधीर देवगिरे,गजानन विजेकर नगरसेवक आंशिक अन्सारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सफाई कर्मचारी चेतन तांबे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी मला गणपती मूर्ती स्थापन करण्याचा मान दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हा सन्मान माझ्या कामाचा खरा गौरव आहे.नगरपरिषदेच्या गणपती मूर्तीच्या स्थापनेमुळे आणि या उपक्रमामुळे शहरात सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश गेला असून, पुढील दिवस नगर परिषद परिसरात भक्तिमय वातावरण राहणार आहे.
एकत्र येऊन समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू नगरसेवकांना संबोधित करताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले म्हणाले, “लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. ब्रिटिशांच्या काळात भारतीयांना एकत्र येण्यास बंदी होती; तो नियम टाळून लोक एकत्र यावेत आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे हा त्यांचा मूळ हेतू होता. देशभक्तीपर गीते, प्रवचने आणि चर्चा घडवून आणल्या गेल्या. विकासासाठी सर्व धर्म समभावया नात्याने एकजूट होऊन शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करूया.