![]()
भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त सोमवारी अकोट शहरासह परिसरात लाडक्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल-फुलांची उधळणीत आणि पारंपरिक भजनांच्या सुरांत अत्यंत भक्तिमय वातावरणात थाटात आगमन झाले. यंदा अकोट शहरात तब्बल ८९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलीस प्रशासनाकडून रीतसर पूर्वपरवानगी घेतली आहे. शहरभरात उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागताची जोरदार लगबग सुरू होती. विविध भागांत नयनरम्य मंडप उभारण्यात आले आहेत. प्रमुख रस्त्यांवर भगवे ध्वज, स्वागत कमानी आणि दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नामांकित मंडळांकडून यंदा सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर केले जाणार आहेत. घरगुती गणपतींच्या स्थापनेसाठी सोमवार सकाळपासूनच मूर्ती, मखर, दिव्यांच्या माळा आणि पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. यंदा बालरूपातील आकर्षक गणेशमूर्तींना भाविकांची सर्वाधिक पसंती लाभली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात ८ पोलीस अधिकारी, ९० पोलीस अंमलदार, आरसीपीची एक प्लाटून, एसआरपीएफची एक प्लाटून, ५० होमगार्ड जवान आणि एक स्ट्रायकिंग फोर्स शहरात तैनात करण्यात आली आहे. याशिवाय प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर पोलिसांची करडी नजर आहे. मंडळाकडून बालगणेश मूर्तींना सर्वाधिक पसंती यंदाच्या गणेशोत्सवात बाल रूपातील गणेशमूर्तींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मोदक घेतलेला बालक, विविध क्रीडारूपांतील गणेश अशा नयनरम्य मूर्तींची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. मूर्तींच्या किमतीत काहीशी वाढ झालेली असतानाही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून आली नाही. सोमवार सकाळपासूनच मूर्ती, मखर, दिव्यांच्या माळा आणि पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
Source link
अकोटमध्ये 89 सार्वजनिक मंडळात विघ्नहर्तांचे थाटात झाले आगमन:यंदा सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक देखाव्यांची मेजवानी