Headlines

निघोजमध्ये 50 हून अधिक गणेश मंडळांची पर्यावरणपूरक वाटचाल:ढोल-ताशा, पिपाणीच्या तालावर दिवसभर मिरवणुका, नागरिकांना त्रास होणार नाही, याची मंडळांची ग्वाही‎



गणपती बाप्पांच्या आगमनाचे निघोज आणि परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंग, झांज, ताशा-पिपाणी पथकांच्या तालावर ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘उंदीरमामाच्या जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. निघोज व परिसरात ५०हून अधिक गण

.

आदर्श गणेश मंडळांना ऑक्टोबरमध्ये पुरस्कार निघोज जिल्हा परिषद गटातील आदर्श गणेश मंडळांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच मंडळांचे पदाधिकारी व सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, पारनेर तालुका पत्रकार संघ आणि पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज यांच्या वतीने ऑक्टोबरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक गणेश मंडळांनी पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोजचे मुख्य समन्वयक दत्तात्रय उनवणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकार संघांच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *