![]()
शहरी भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. परतवाडा परिसरातील कांडली, देवमाळी आणि अचलपूरमध्ये माकडांच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. या त्रासाला आळा घालण्यासाठी वन विभागाने एक अनोखी उपाययोजना केली. माकडांना पोळीचे आमिष दाखवून पिंजऱ्यात पकडण्यात आले. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. माकडं घरात घुसून नागरिकांच्या अंगावर धावून जात होती. तसेच, छतावरून ये-जा करणाऱ्या लोकांना चावा घेत होती. यामुळे नागरिक खूप त्रस्त झाले होते. नागरिकांच्या या समस्येची दखल घेत वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने बुधवारी कारवाई केली. कांडली परिसरात वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने विशेष मोहीम राबवून 30 ते 35 माकडांना सुरक्षितपणे पकडले. या मोहिमेत माकडांना पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाने एक युक्ती केली. माकडांना पिंजऱ्यात आणण्यासाठी पथकाने कांडलीतील घरोघरी जाऊन पोळ्या मागितल्या. नागरिकांनीही या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आणि पोळ्या दिल्या. ताज्या पोळ्यांचे आमिष दाखवून एकापाठोपाठ एक अशा 30 ते 35 माकडांना वनविभागाने तयार केलेल्या पिंजऱ्यात पकडले. वनविभागाच्या या युक्तीमुळे कांडली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पकडलेल्या सर्व माकडांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांना लवकरच घनदाट जंगलात सोडण्याची तयारी वनविभागाने सुरू केली आहे. वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हेही वाचा… शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?:विलिनीकरणाच्या चर्चेवर रोहित पवारांचं स्पष्ट उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील राजकीय वाटचाल काय असेल, याबाबतही विविध तर्क लावले जात आहेत. त्यातच शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सविस्तर वाचा..
Source link
पोळीच्या आमिषाने 30 ते 35 माकडं जेरबंद:कांडली, परतवाडा परिसरात माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी वनविभागाचा अफलातून उपाय