![]()
रतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक वर्षांपासून पडून असलेल्या 131 बेवारस, अपघातग्रस्त आणि भंगार वाहनांचा जाहीर लिलाव होणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, हा लिलाव रविवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कल्याण मंडपम येथे आयोजित केला आहे. पोलीस निरीक्षक (मोटार परिवहन विभाग) यांनी या सर्व वाहनांची ‘रद्दी/भंगार’ म्हणून किंमत ठरवली आहे. लिलावासाठी ठेवलेली ऑटो आणि दुचाकी वाहने तपासणीसाठी परतवाडा पोलीस ठाण्यात उपलब्ध आहेत. वाहनांची सविस्तर यादी आणि लिलावाच्या अटी व शर्ती पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डवर लावल्या आहेत. लिलावात सहभागी होण्यासाठी व्यावसायिकांकडे कायदेशीर गुमास्ता (भंगार दुकानांचा परवाना), जीएसटी नंबर, आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे पूर्ण झाल्यावरच फॉर्म भरून लिलावात भाग घेता येईल. इच्छुकांना 50 हजार रुपये अनामत रक्कम सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल. पोलीस प्रशासनाने कोणतेही कारण न देता लिलाव रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आहे. अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक अजय श्रावण आकरे (8668474854) किंवा पदमिनी महल्ले (7376044290) यांच्याशी संपर्क साधता येईल. लिलावात विकली जाणारी वाहने, त्यांचे साहित्य, इंजिन किंवा चेसिस भविष्यात कोणत्याही प्रकारे पुन्हा वापरता येणार नाहीत. ही सर्व वाहने फक्त भंगार (स्क्रॅप) म्हणूनच विकली जातील. वाहनाच्या सुट्या भागांचा पुन्हा वापर केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
Source link
परतवाडा पोलीस ठाण्यातील 131 बेवारस वाहनांचा लिलाव:29 सप्टेंबर रोजी कल्याण मंडपम येथे सकाळी 11 वाजता होणार, अनामत रक्कम 50 हजार.