Headlines

मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना उद्धव ठाकरे यांचे अभिवादन:सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. बुधवारी (दि.16 सप्टेंबर) रात्री छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकास भेट देत उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढा देताना बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करत उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासात हुतात्म्यांचे योगदान आणि त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील व उपनेत्या ज्योतीताई ठाकरे उपस्थित होते. हेही वाचा… राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?:विलिनीकरणाच्या चर्चेवर रोहित पवारांचं स्पष्ट उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील राजकीय वाटचाल काय असेल, याबाबतही विविध तर्क लावले जात आहेत. त्यातच शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *