आठवड्याभराचा ब्रिटन दौरा यशस्वीरीत्या पूर्ण करून मुंबईत परतलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मोबाईल फोन ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच राहिल्याची घटना मध्यरात्री घडल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई विमानतळावरून घर
.
दरम्यान, शिंदे यांच्या लंडन दौऱ्यात त्यांना ब्रिटनच्या संसदेतील कार्यक्रमांमध्ये विविध सन्मान मिळाले. हाऊस ऑफ लॉर्ड्समधील ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’, हाऊस ऑफ कॉमन्समधील ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ आणि लंडन महाराष्ट्र मंडळाचा ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार या दौऱ्याच्या केंद्रस्थानी होते.
नेमकी काय घडली घटना? मध्यरात्री यंत्रणांची धावपळ
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनहून ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने सलग 9 तासांचा प्रवास करून मध्यरात्री 2 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल, माजी आमदार तुकाराम काते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. माध्यमांशी संवाद साधून व हारतुरे स्वीकारून शिंदे आपल्या निवासस्थानी रवाना झाले. निवासस्थानी पोहोचल्यानंतर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आपला वैयक्तिक मोबाईल जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क करण्यात आले. पोलिसांनी सूत्रे हलवत तातडीने मुंबई विमानतळावरील ब्रिटिश एअरवेजच्या सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधला. विमानाची झडती घेतल्यानंतर शिंदे विसरलेला मोबाईल सुखरूप हाती लागला आणि पहाटे 4 वाजता तो पुन्हा उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून वृत्ताचे खंडन
माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्र्यांचा मोबाईल विमानात विसरल्याची आणि पोलिसांची पळापळ झाल्याची चर्चा रंगताच उपमुख्यमंत्री कार्यालयाने (DCMO) त्यावर स्पष्टीकरण दिले. अशी कोणतीही घटना घडलेली नसून, मोबाईल गहाळ झाल्याचे वृत्त तथ्यहीन असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांचा फोन गहाळ झाल्याची चर्चा रंगली होती, त्यामुळे या ताज्या वृत्ताने प्रशासकीय व राजकीय वर्तुळात तत्काळ लक्ष वेधून घेतले.
पुरस्कार आणि भाषणाने गाजलेला लंडन दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 सप्टेंबर रोजी आपल्या सहकाऱ्यांसह इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले होते. हा दौरा विविध कारणांमुळे विशेष चर्चेत राहिला. ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये त्यांना ‘कॉमनवेल्थ लीडरशिप रेकग्निशन’, ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेट्समनशिप ॲवॉर्ड’ आणि स्थानिक महाराष्ट्र मंडळाच्या वतीने ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या 3 प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ब्रिटिश संसदेत त्यांनी केलेले अस्खलित इंग्रजी भाषण आणि लंडनच्या रस्त्यांवर सहकाऱ्यांसोबत घेतलेला महाराष्ट्रीयन वडापावचा आस्वाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 12 सप्टेंबर रोजी दौरा आटोपून ते मुंबईत परतले होते.
गौरी-गणपती उत्सवासाठी दरे या मूळ गावी रवाना
दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गौरी-गणपती उत्सवासाठी सातारा जिल्ह्यातील आपल्या ‘दरे’ या मूळ गावी रात्री उशिरा पोहोचले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते कुटुंबासह पारंपरिक गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मूळ गावी दाखल झाले आहेत. आज दिवसभर ते दरेगावात मुक्कामी असून, पारंपरिक पद्धतीने गौरी-गणपती पूजन करणार आहेत तसेच स्थानिक गावकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
—————–
हेही वाचा…
मोदी-शहा हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते: त्यांच्या पक्षाची घटना गुजराती, निवडणूक आयोग अमित शहांचा घरगडी- संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खरे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे मुख्य कार्यालय गुजरातमध्ये असून, पक्षाचे नेते गुजराती आहेत. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठीच एकनाथ शिंदे गुजराती भाषेत बोलले असावेत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी