Headlines

झळ:गतवर्षी पूर; यंदा सीनाकाठच्या ऊस शेतीची होरपळ




गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी ११ दिवस शेतात राहिल्याने हातातोंडाशी आलेला घास पुराने हिरावून घेतला. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनीच्या पाण्याने सिना नदी भरली असली तरी शेतीला पुरेशी वीजच मिळत नसल्याने पाण्याअभावी पिके जळू लागल्याने दर आठवड्याला एक एकर ऊस सोडून देण्याची वेळ आल्याची व्यथा सीनाकाठी असलेल्या खैराव येथील शेतकरी कृष्णात गोवर्धन नागटिळक यांनी मांडली. माढा तालुक्यातील खैराव येथील शेतकरी असलेल्या नागटिळक यांना १८ एकर जमीन असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी सीना नदीला महापूर आल्याने अकरा दिवस पुराचे पाणी शेतात राहिले. यंदा झालेल्या नुकसानीची कसर निघेल या भाबड्या आशेने एकरी ४० हजार रुपये खर्च करून ऑक्टोबर महिन्यात ९ एकर ऊस, ४ एकर वैरण आणि दोन एकर कडवळाची लागवड केली. त्यासाठी ५ लाखांवर खर्च केला. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली. उजनी धरणातून सिना नदीत पाणी सोडण्यात आले आहे, परंतु विजेचा पर्याप्त पुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने दर आठवड्याला एक एकर ऊस जळत आहे. पाणी असूनही पिके सोडून देण्याची वेळ आल्याचे सांगत शासनाने जळालेल्या पिकांचे करून भरीव मदत करावी, अशी मागणी नागटिळक यांनी केली आहे. ^प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून पीक परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात आले आहेत. शासन स्तरावरील आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. संजय वाकडे, उपविभागीय कृषी अधिकारी यंदा सरासरीच्या केवळ ५०.४६ टक्के पाऊस झाला आहे. पिके करपली असून तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. -कृष्णात नागटिळक, खैराव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *