Headlines

आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू:अकोल्यात पावसाची शक्यता




राज्यात शनिवारपासून (दि. १९) परतीचा पाऊस सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या मुंबईकडून सोलापूरकडे आणि गुजरातकडून छत्रपती संभाजीनगरकडे वारे वळत आहेत. शनिवारनंतर (दि. १९) ही दिशा बदलण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. यंदा ‘एल निनो’च्या तीव्र प्रभावामुळे मान्सूनच्या नैसर्गिक प्रवाहात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ निम्मा पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६९३ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा आतापर्यंत अवघा ४१० मिमी पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. शनिवारी (दि. १९) दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुषार किंवा सरी कोसळू शकतात. सध्या समुद्र आणि जमिनीचे तापमान सारखेच उष्ण राहिल्याने हवेच्या दाबातील फरकात मोठी विषमता निर्माण झाली आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा किंवा चक्रीवादळ निर्माण झाल्यास महिनाभर पावसाची शक्यता नाकारता येत नाही. याव्यतिरिक्त, स्थानिक पातळीवर तापमान वाढल्यास ‘लो-प्रेशर एरिया’ तयार होऊ शकतो. गारांशिवाय हलका पाऊस पडू शकतो. यंदा हिवाळ्यात थंडीचा जोर राहणार कमी: ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागरासह अरबी समुद्र व बंगालचा उपसागर उष्ण राहिला आहे. यामुळे यंदाच्या हिवाळ्यात उत्तर भारतात चांगली थंडी जाणवेल, परंतु मध्य आणि दक्षिण भारतामध्ये थंडीची तीव्रता तुलनेने बऱ्याच अंशी कमी राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. “एल निनो’चा फटका “यंदा ‘ “एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनचा नैसर्गिक प्रवास विस्कळीत झाला आहे. “एल निनो’चा यंदा सर्वाधिक फटका बसला आहे. शनिवारपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत आहे. वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत आहेत. अकोल्यात सरासरी ६९३ मिमी असताना आतापर्यंत केवळ ४१० मिमी पाऊस झाला आहे. समुद्र व जमिनीचे तापमानसारखे असल्याने मोठा पाऊस अडकला आहे. तरीही ऑक्टोबरमध्ये चक्रीवादळ किंवा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास पावसाचा काहीसा दिलासा मिळू शकतो. तसेच यंदा मध्य व दक्षिण भारतात थंडीची तीव्रता कमी राहील. प्रा. डॉ. सुरेश चोपने , हवामान तज्ज्ञ.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *