![]()
नांदेड येथील दुष्काळी आढावा बैठकीत काजू बदाम प्लेटच्या टीकेनंतर कृषिमंत्र्यासह लोकप्रतिनिधींनी हिंगोली जिल्ह्यात हिवरा जाटू शिवारामध्ये जमिनीवर बसून बेसन भाकरीचा आस्वाद घेतला. काजू-बदामावरील होणारी चर्चा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी काजू-बदाम खाल्ले. त्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उंमटू लागल्या. वसमत तालुक्यातील टाकळगाव येथेच कृषिमंत्री भरणे यांचा ताफा आडवून त्यांना काजू बदाम ची प्लेट देण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी १९ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शेतशिवारात शेतातील पिकांची पाहणी केली आहे. कृषिमंत्र्यांच्या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी कृषीमंत्री भरणे यांच्यासमोर साहेब सर्वच शेतातील पीक गेले मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण कसे करणार, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार अशी व्यथा मांडली. सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन शेतकऱ्याला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथील शेतकरी शंकर दत्तराव कऱ्हाळे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर यांच्या शेतातील बांधावर बेसन भाकरी हिरव्या मिरच्याचा ठेचा असा जेवणाचा आस्वाद घेतला.यावेळी राज्यसभा खासदार रामराव वडकुते ,आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, माजी जिल्हाध्यक्ष बि.डी बांगर, कृषी आयुक्त सुरेश मांढरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, शेतकरी किसन कहाळे प्रल्हाद कहाळे दत्तराव उघडे बापूराव उघडे तुकाराम शिंदे संतोष काळे माधव पंडित यांच्या सह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांची भूमिका लक्षात घेता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख, पोलिस उपनिरीक्षक अमोल इंगोले पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस, पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरूपवार, संतोष पवार, रविकांत हरकाळ, किशोर पारीसकर, ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नांदेड येथे दुष्काळी आढावा बैठकीनंतर काजू बदाम वरून सुरू असलेली टीका लक्षात घेता हिवरा जाटू येथे लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसून पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला. हा प्रकार म्हणजे काजू बदामच्या टिकेचा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया ही आता उमटू लागली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. बैठकीत खाण्यापेक्षा बांधावर खा!:हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांनाच दिली काजू-बदामाची प्लेट; दत्तात्रय भरणेंचा ताफा अडवला मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी पिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत पिकांची पाहणी केली. मात्र, यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. वाचा सविस्तर
Source link
नांदेडमध्ये 'काजू-बदाम', तर हिंगोलीत 'बेसन-भाकरी'!:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न?