Headlines

चाकणमध्ये ₹1.13 कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त:सहा तासांच्या पाठलागानंतर ट्रक पकडला




अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीच्या आधारे चाकण येथे कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण ₹1 कोटी 13 लाख 54 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सुमारे 6 तासांच्या पाठलागानंतर करण्यात आली. प्रशासनाला माहिती मिळाली होती की, मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी-ठाणे येथे येणारा टाटा ट्रक मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने येत आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली. ठाणे विभागाचे पथक मुरबाडकडे, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे थांबले होते. राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता पुढे नेला. सावळे यांनी पाठलाग सुरू ठेवला. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्री 8च्या सुमारास चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवण्यात आला. तपासणीत रजनीगंधा, तानसेन आणि आरएमडी पानमसाला, तुळशी रॉयल जाफरानी जर्दा तसेच टी.ओ. प्रीमियम जर्दा असा ₹93 लाख 54 हजार 600 रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळला. ₹20 लाखांचा ट्रकही जप्त करण्यात आला. रात्रभर जप्तीची नोंद, कागदपत्रे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर चाकण उत्तर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात चालक नफीस मेहबूब खान याच्यासह निलेश राठी, अरुण पाटील, संजय माटा आणि मे. जेएमडी एंटरप्रायझेस यांना आरोपी बनवण्यात आले आहे. आरोपींचे पूर्वगुन्हे, आर्थिक व्यवहार आणि पुरवठा साखळी तपासली जाईल. दोषी आढळल्यास मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याची विनंती प्रशासनाने पोलिसांना केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *