Headlines

अंजनगाव बारी परिसरात सायकल चोरीच्या घटना वाढल्या:अनेक गुन्हे दाखल, तरीही सायकलींचा शोध नाही; नागरिकांकडून उपाययोजनांची मागणी




अंजनगाव बारी परिसरात सायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे लेखी तक्रारीही दिल्या आहेत, पण अद्याप चोरीला गेलेल्या सायकली सापडलेल्या नाहीत. सुरेश धुर्वे यांची सायकल 23 ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती. त्यांनी 25 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दिली. याशिवाय वामनराव दारोकार, सुरेश भुरे, मधुकर मुळे, मोहन जुमळे, दादाराव पोकळे, दिलीप उराडे आणि भिवा सैरीशे यांच्याही सायकली चोरीला गेल्या आहेत. पार्डी येथील नारायण पिसे यांची सायकल चोरीला गेल्यानंतर त्यांनी 8 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना एका संशयिताचे नावही सांगितले, पण तरीही त्यांची सायकल अद्याप मिळालेली नाही. एकापाठोपाठ सायकल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही नागरिकांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *