Headlines

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप:आखतवाडे येथील रा. का. पाटील दिघावकर विद्यालयामध्ये उपक्रम‎




आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ शालेय साहित्याअभावी थांबू नये आणि आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक घडावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बागलाण तालुक्याच्या वतीने आखतवाडे येथील रा. का. पाटील दिघावकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव मदतीसाठी तत्पर आहे; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आजची ही बालके भविष्यात निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष किशोर ह्याळीज, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिगंबर सोनवणे, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष नंदराज देवरे, मुख्याध्यापक साहेबराव अहिरे, सटाणा कार्याध्यक्ष नंदू सोनवणे आदींसह सर्व शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारे निवृत्त मुख्याध्यापक नंदराज देवरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *