![]()
येथील गोरक्षण रोडवरील रिद्धी सिद्धी नगरातील नागरिक संजय देशमुख यांनी घरी गणेशोत्सवात कला व सामाजिक जाणिवेचा सुंदर समन्वय घातला आहे. स्वतः शाडू मातीपासून ‘बळीराजा’ म्हणजेच शेतकऱ्याच्या रूपातील गणेशाची मूर्ती घडवून त्यांनी समाजाला विचार करायला लावणारा
.
आव्हानात्मक परिस्थितीतही शेतकरी सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतो. शेतीपूरक व्यवसाय करतो. स्वतःची बाजारपेठ उभारतो. सहकारी संस्था व विविध आर्थिक व्यवस्था निर्माण करतो. स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करतो. हे देखाव्यातून दाखवले आहे. संपूर्ण देखावा उभारताना पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व ‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुनर्वापरयोग्य वस्तूंचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. एकीकडे शाडू मातीच्या मूर्तीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. दुसरीकडे टाकाऊ साहित्यातून अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमात त्यांना कुटुंब व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. हा देखावा सध्या नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
अनिश्चित हवामान, अतिवृष्टी व आर्थिक संकटांशी सातत्याने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता व चिकाटी या देखाव्यातून मांडण्यात आली आहे. शेतीतील कष्टांचे पावित्र्य अधोरेखित करत जगाच्या पोशिंद्याला समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना या माध्यमातून समाजासमोर ठेवली आहे.