![]()
दीड महिन्यापासून पावसाने मारलेली दडी, डोळ्यांदेखत करपून जाणारे सोयाबीन, सरकारच्या ढिम्म कारभाराविरोधात तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. त्यातच ‘पालकमंत्री आणि आमदारांचा शेताच्या बांधावरील फोटो दाखवा, अन् रोख बक्षीस मिळवा’ अशी सामाजिक कार्यकर्
.
सोयाबीनच्या नगदी पिकावर शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी अवलंबून असते. मात्र, करपलेल्या पिकांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याने प्रशांत कांबळे यांनी उपरोधिक आंदोलनाची हाक दिली होती. पालकमंत्र्यांचा दौरा केवळ सोपस्काराचा, धावता असल्याचे दिसताच सार्सी, शिरजगाव मोझरी परिसरातील शेतकरी, तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पालकमंत्र्यांना जाब विचारला. धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा बुद्रुक, मार्डी या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे सांगत प्रशांत कांबळे, स्थानिक शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर तुटून पडलेल्या पिकांची व्यथा मांडली. मागील वर्षी अतिवृष्टी. यंदा दुष्काळ. या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपल्या मागण्या मांडल्या. आता केवळ धावते दौरे न करता सरकारने तात्काळ हेक्टरी १ लाखांची मदत द्यावी. दुष्काळ जाहीर करावा. नाहीतर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात पेटेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेस पदाधिकारी विश्वजीत बाखडे, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सुनील बाखडे, शशांक राऊत, संजय चौधरी, मनोज डीगांबरे, संदीप हगवणे, गौरव चौधरी, सर्जा वाघमारे, आकाश माहोरे, पुरुषोत्तम मेश्राम, आकाश मकेश्वर, निलेश गुडधे, प्रवीण देशमुख, रवींद्र बनकर, अभिजित साबळे, श्रीधर कोहळे, संदीप वानखडे, रमेश कोहळे, अमोल काळे यांच्यासह शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, महामार्गालगतच्या शेतात पोहोचताच संतप्त शेतकरी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला.
या आहेत मागण्या तिवसा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये सानुग्रह मदत द्या, अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी लागू करा, महसुली व पीक कर्जाच्या वसुलीस त्वरित स्थगिती देऊन बांधावर जाऊन पंचनामे करा.