![]()
येत्या २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील विकासकामे वेगाने पूर्ण करा. यात्रेपूर्वी, यात्रेत आणि यात्रेनंतरही वारकऱ्यांना येथे येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या
.
या मार्गावरील विकासकामांसाठी १,३०३ कोटींच्या आराखड्यापैकी ९६४ कोटींची कामे मंजूर झाल्याचीही माहिती दिली. मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आषाढी यात्रेच्या तयारीची आढावा बैठक झाली.
५ हजार ‘मोबाइल टॉयलेट’
गतवर्षी दोन्ही पालखी मार्गांवर ३,७०० मोबाइल शौचालये होती. यंदा ५,००० मोबाइल शौचालये पुरवण्याचे उद्दिष्ट आहे, असे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
७ जुलै पालख्याचे प्रस्थान
२५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार आहे.
मंजूर ९३४ कोटी रुपयांपैकी ९५९ कोटींची कामे मार्गी
निधीचा वापर : आराखड्यातील १,३०३ कोटींपैकी ९६४ कोटी रुपये मंजूर असून, त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च करून कामे मार्गी आहेत. पूर्ण कामे: पालखीतळांवर स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानी, हायमास्ट पोल, भिंती, रस्ते दुरुस्ती, ‘पालखी कट्टा’कामे पूर्ण.