Headlines

संजय राऊत आता शरद पवारांना विश्वासार्हता शिकवणार का?:उद्या ते उद्धव ठाकरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील- नवनाथ बन




संजय राऊत आता इतके मोठे नेते झाले आहेत की ते शरद पवार यांना विश्वासार्हता काय असते हे सांगत आहेत. शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे संजय राऊत उद्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, गद्दार कोण आहे हे जनतेला माहिती आहे. 2019 मध्ये युतीला जनतेने निवडून देत देवेंद्र फडणवीस यांना लोकांनी आशीर्वाद दिला होता. पण उद्धव ठाकरेंना गद्दारी करत काँग्रेसला साथ देत सत्ता मिळवली. तुम्ही विश्वासार्हतेवर बोलू नये.खाल्लेल्या ताटात छेद देणं हा राऊतांचा जुना धंदा आहे, असा टोला बन यांनी लगावला आहे. सत्तेची मस्ती लोकांनी 2019 मध्ये अनुभवली नवनाथ बन म्हणाले की, अहंकार, सत्तेची मस्ती काय असते हे उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात दिसून आले. देवेंद्र फडणवीस हे विकासाचे राजकारण करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. मराठीच्या नावावर ढोंग करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या घरात डोकावावं. ज्यां पुस्तकात बघून रामरक्षा वाचता येत नाही ते लोकं मराठी अस्मितेच्या गप्पा मारतात असा टोला बन यांनी उबाठाला लगावला आहे. तर राहुल गांधींची गुलामी करणाऱ्यांनी ‘भाडे के टट्टू’ची भाषा करू नये. म्हणूनच जनतेने तुम्हाला नाकारले नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्राची बदनामी काय असते हे जनतेने उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात बघितले आहे. मंदिर बंद ठेवायची आणि दारुची दुकाने उघडी ठेवायची. कार्टुन फॉरवर्ड केले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडायचे, केतकी चितळेला अटक करणारे तुम्ही, पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांना बेड्या ठोकणारे तुम्ही. साधूंचे हत्याकांड करणारे आणि महाराष्ट्राला लुटणाऱ्या तुमच्या कार्यकाळात महाराष्ट्राची खूप बदनामी झाली. म्हणूनच जनतेने तुम्हाला नाकारले आहे. तुमच्याकडून याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण नवनाथ बन म्हणाले की, ज्यांनी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केले ज्यांनी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्षपद स्वीकारले, अफजल खानाचा उदोउदो केला, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत यांनी काँग्रेसच्या बाजूला बसून हिंदुत्ववाद सोडून दिला. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून दिले आहेत, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राऊतांना औरंगजेब, अफजल खान प्रिय नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना अफजल खान, औरंगजेब प्रिय झाला आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्ववादाशी प्रतारणा केली आहे. तुम्हाला तुघलक, निजाम आठवतात कारण तुम्हाला दाढ्या कुरवळायची सवय झाली आहे. राऊत महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला चांगलेच ओळखले आहे.
संबंधित बातमी वाचा… मिसिंग लिंकवरून विरोधकांना फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर:म्हणाले- मला बदनामा करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका; 13 हजार कोटींचा पूर नियंत्रण आराखडा मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अतिवृष्टी, पूरस्थिती, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर विधानसभेत नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी त्यांनी मुंबईत अवघ्या सहा दिवसांत पावसाळ्यातील सुमारे 42 टक्के पाऊस झाल्याचे सांगत हा अपवादात्मक पाऊस असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबईची तुंबई रोखण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार केल्याची माहिती दिली. मिसिंग लिंक प्रकल्पावरील टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आघाडी सरकारने हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगून फाइल बंद केली होती, तर महायुती सरकारने तो प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवल्याचा दावा केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना बैठकीसाठी अख्खे विधानभवन काय ओस पडले होते का? समोरच वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी भवन असताना गद्दाराच्या दारात जाणे आम्हाला पटत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *