![]()
अमरावतीतील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन प्रकरण अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून मोठी खंडणी उकळण्याचे किंवा ‘हनी-ट्रॅप’चे हे एक संघटित रॅकेट असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आरोपी अयान अहमद एका नव्या व्हिडिओत एका आलिशान ‘महिंद्रा थार’ गाडीत बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी महागडे मोबाइल, पिस्तूलसदृश शस्त्र आणि नोटांचे मोठे बंडल आहे. एका साध्या तरुणाकडे एवढी मोठी रोकड आणि हत्यारे कोठून आली? यामागे कोणती मोठी गुन्हेगारी टोळी किंवा ‘फायनान्सर’ सक्रिय आहे का? हे महागडे मोबाइल अश्लील व्हिडिओ तयार करून त्याची विक्री करण्यासाठी वापरले जात होते का? या प्रश्नांची पोलिस उत्तरे शोधत आहेत. ९ मुलींचे व्हिडिओ झाले व्हायरल, पण तक्रारी दोनच आतापर्यंत ९ अल्पवयीन मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो व्हायरल झाले असून, केवळ दोनच तक्रारी दाखल झाल्या आहेत. आरोपींची दहशत, पैशांचा माज आणि बदनामीच्या भीतीमुळे उर्वरित कुटुंबीय गप्प असल्याचे स्पष्ट होत आहे. आता एसआयटीसमोर थार गाडी आणि रोकडीचा खरा आर्थिक स्रोत शोधण्याचे मोठे आव्हान आहे. व्हिडीओत दिसणारे पिस्तूल खरे आहे का आणि ते कुठून आले, याचा छडा लावला जात आहे. हे व्हिडिओ केवळ स्थानिक पातळीवर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले की ‘डार्क वेब’ किंवा अश्लील वेबसाइटवर विकून पैसा कमावला, याचा तपास सायबर पोलिस करत आहेत. दहशतीखाली असलेल्या सात पीडितांना विश्वासात घेऊन सुरक्षा देणे, हे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. अयान व त्याच्या साथीदारांना कोर्टात आणले तेव्हा बाहेरच्या जमावाने हल्ला करू नये म्हणून पोलिसांचा असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Source link
नव्या व्हिडिओत अयानकडे थार, पिस्तुलासह नोटा बंडले:अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल केल्याचा संशय