![]()
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सडकून टीका करत आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. “कोणत्याही गोष्टीला नुसता विरोध करणे फार सोपे असते, मात्र प्रत्यक्ष चांगले काम करून दाखवणे महत्त्वाचे असते,” असा टोला पटेल यांनी लगावला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 10 वर्षांच्या कामांचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले. “नुसती टीका करून चालणार नाही, स्तुतीही करा” विरोधकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेते सरकारवर सातत्याने आरोप करत असतात. मात्र, कसं आहे की, केवळ विरोध करणं फार सोपं असतं. त्यापेक्षा चांगलं काम करून दाखवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने केलेल्या चांगल्या कामांची स्तुती करणेही आवश्यक आहे, केवळ टीका करून चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक करताना पटेल म्हणाले की, गेल्या10 वर्षांच्या काळात केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिक आणि गरिबांसाठी अनेक महत्त्वाच्या कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा थेट फायदा तळागाळातील लोकांना झाला आहे. सरकारने केलेल्या या विकासकामांकडे विरोधकांनी डोळेझाक करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यूपीए सरकारच्या काळाची आठवण राहुल गांधींना त्यांच्याच पक्षाच्या सत्तेच्या काळाची आठवण करून देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “अनेक गोष्टी ज्या राहुल गांधी किंवा इतर विरोधक मांडतात, त्यावर मला सांगायचे आहे की, या देशात 10 वर्षे यूपीएचे (UPA) सरकार पण होते. विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती कधीच थांबत नाही.” यूपीएच्या काळातही कामे झाली आणि आताही होत आहेत, त्यामुळे चांगल्या कामाचे श्रेय देण्याची वृत्ती विरोधकांनी दाखवावी, असा अप्रत्यक्ष सल्लाच प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे. हेही वाचा.. संजय राऊतांचा भाजप-फडणवीसांवर घणाघात: म्हणाले- भाजपने शेकडो कोटी खर्च केले, पण आता मोदीच ‘पप्पू’ ठरलेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यात केंद्र सरकारच्या धोरणांवर केलेल्या टिकेवरून सध्या देशातील राजकारण तापले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधींनी मारलेला बाण भाजपच्या काळजात आरपार घुसला आहे. राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी या लोकांनी शेकडो कोटी रुपये खर्च केले, पण आता याच राहुल गांधींनी मोदींना ‘पप्पू’ ठरवले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. सविस्तर वाचा
Source link
प्रफुल्ल पटेलांचा राहुल गांधींवर निशाणा:म्हणाले- विरोध करणं सोपं, पण चांगले काम करून दाखवणं महत्त्वाचे