Headlines

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान पोलिसांची धडक कारवाई:कसबा पेठेत 42 लाखांची संशयास्पद रोकड जप्त; तपास प्राप्तिकर विभागाकडे सोपवला




गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात कसबा पेठेतील जिजामाता चौकात एका व्यक्तीकडे 42 लाख रुपयांची संशयास्पद रोकड सापडली. फरासखाना पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौकात एका व्यक्तीकडे मोठी रोख रक्कम असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली होती. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील पिशवी जप्त केली. पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड का बाळगली होती आणि या रकमेचा स्रोत काय आहे, याबाबत पोलिसांनी चौकशी केली. हे प्रकरण पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात आले आहे. फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले की, पोलिसांनी याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली असून, प्राप्तिकर विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.दुसऱ्या एका घटनेत, औंध रस्त्यावरील एका बँकेच्या आवारात मदतीचा बहाणा करून एका बँक खातेदाराकडील दहा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. खडकी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 50 वर्षीय अपंग खातेदाराने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे व्हिलचेअरवरून खडकीतील औंध रस्त्यावरील एका राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. बँकेच्या आवारात थांबले असताना एक चोरटा त्यांच्याजवळ आला.चोरट्याने बँकेत पैसे भरणा करण्यासाठी मदतीचा बहाणा केला. तक्रारदाराने त्याला दहा हजार रुपये दिले. भरणा करण्यासाठी दिलेली पावती घेऊन चोरटा बँकेत गेला. त्याने भरणा केल्यानंतर बँकेने दिलेली पावती तक्रारदाराला दिली आणि खात्यात दहा हजार रुपये भरल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात चोरट्याने तक्रारदाराच्या खात्यात रोकड जमा केली नव्हती. दहा हजार रुपयांची रोकड चोरून चोरटा पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी बँकेच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलिस हवालदार सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *