![]()
राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या अतिखंडामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 27 सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर नाशिक येथे होणारे पक्षाचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 19 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने पिके, चारा आणि पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः 19 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. पावसाअभावी शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, ग्रामीण भागातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पीक परिस्थिती, चारा उपलब्धता तसेच पिण्याचे आणि शेतीसाठी आवश्यक पाणी याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय राज्यातील शेतकरी दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जात असताना पक्षाचे मोठे राज्यव्यापी शिबीर आयोजित करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सध्याची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिबिरासाठी राज्यभरातून पक्षाचे मंत्री, आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिक येथे एकत्र येणार होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पक्षाच्या राजकीय कार्यक्रमापेक्षा शेतकरी आणि ग्रामीण भागातील समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे आवाहन दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपापल्या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे आवाहन केले आहे. दुष्काळाच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून आवश्यक उपाययोजनांना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर पाणी, चारा आणि पीक परिस्थितीबाबत उद्भवणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, नाशिक येथे 27 सप्टेंबर रोजी होणारे हे राज्यव्यापी शिबीर आता परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नव्या तारखेला आयोजित केले जाणार आहे. हेही वाचा… धार्मिक सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी:ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ध्वनी प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या सुमोटो जनहित याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्याचे तोंडी निर्देश दिले. तसेच मिरवणुकांमध्ये आवाज वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरसारख्या उपकरणांवरही बंदीचे निर्देश देण्यात आले. सविस्तर लिहा….
Source link
राज्यातील 19 जिल्ह्यांत दुष्काळसदृश्य स्थिती:शेतकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे 27 सप्टेंबरचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलले