Headlines

राजकीय आरोपांचा MPSC च्या भावी अधिकाऱ्यांना फटका:राज्यातील 84 दुय्यम निबंधक पदांची कागदपत्र पडताळणी स्थगित, पात्र उमेदवारांमध्ये एमपीएससीविराेधात संताप




महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा देऊन अहोरात्र परिश्रमाने दुय्यम निबंधक (श्रेणी-1) तथा मुद्रांक निरीक्षकपदी निवड झालेल्या 84 उमेदवारांची पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात 22 आणि 23 सप्टेंबर रोजी होणारी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ऐनवेळी अचानक स्थगित करण्यात आली. केवळ काही राजकीय आरोप आणि सोशल मिडीयावरील खोट्या दाव्यांमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने, वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक उमेदवारांना धक्का बसला आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला होता. या परीक्षेत हलाखीच्या परिस्थितीत, दिवसरात्र अभ्यास करून आणि कौटुंबिक त्यागाच्या बळावर या 84 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते. नियुक्तीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या या गुणवंत उमेदवारांच्या शैक्षणिक, जात वैधता व इतर आवश्यक कागदपत्रांच्या छाननीची तयारीही पूर्ण झाली होती. 22 व 23 सप्टेंबर रोजी ही प्रक्रिया होणार असताना सोमवारी (दि.21) सायंकाळी पडताळणीच्या अवघे काही तास आधी मोबाईलवर मेसेज प्राप्त झाला, आणि संपूर्ण प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया आणि पर्यायाने प्रत्यक्ष नियुक्ती स्थगित झाल्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून या उमेदवारांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. राजकीय आरोपांमुळे सरकार बॅकफूटवर एमपीएसी परीक्षेत औषध निरीक्षक भरतीमधील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय पक्षांकडून संपूर्ण भरती प्रक्रियेवर संशय निर्माण केला जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच भरतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. यात, ‘एकाच हॉलमधून 12 विद्यार्थी पास झाले’ असा आरोप करत दुय्यम निबंधक भरतीवरही त्यांनी संशय व्यक्त केला. याच राजकीय दबावाला बळी पडत शासनाने थेट नियुक्तीपूर्वीची कागदपत्र पडताळणी प्रक्रियाच रोखली. राजकीय आरोप व पात्र उमेदवारांनी मांडलेली तथ्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *