Headlines

अन्न भेसळ, मेडिकल आणि डेअरींवर तुकाराम मुंडेंचा ‘छापा’:सांगोला येथे ‘ तुकाराम वन्स अगेन’ मधून श्रीराम गणेश मंडळाने दाखवले ‘एफडीए’चे कार्य‎




अन्नभेसळीचे वाढते प्रमाण, दूध संकलन केंद्रांवर दुधात पाणी अथवा अन्य पदार्थांची भेसळ, तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयांवर या सजीव देखाव्यातून जनजागृती केली आहे. दूध, खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू खरेदी करताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याचे प्रबोधनही देखाव्यातून करण्यात आले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या देखाव्यात अन्नभेसळ अधिकाऱ्यांच्या कारवाईचे विविध प्रसंग सादर करण्यात आले आहेत. अन्नभेसळ अधिकारी तुकाराम मुंडे यांची भूमिका नयन लोखंडे यांनी साकारली आहे. दूध संकलन केंद्राच्या मालकाची भूमिका युवराज गाडे, फार्मा कंपनी चालकाची भूमिका कौस्तुभ भोसेकर, तर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन बनवणाऱ्या मामाची भूमिका रूपेश कसबे यांनी केली आहे. शाळेतील शिक्षकाची भूमिका विनायक बेंगलोरकर यांनी साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्रीराम तरुण गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त तुकाराम वन्स अगेन या विषयावर सजीव देखावा साकारण्यात आला आहे. रविवारी (दि. २०) सायंकाळी सात वाजता नगराध्यक्ष आनंद माने व युवा नेते सागर पाटील यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर नागरिकांसाठी हा देखावा खुला करण्यात आला. ‘तुकाराम वन्स अगेन’ या देखाव्याची संकल्पना मंडळाचे कार्यकर्ते श्रीशैल्य घोंगडे यांनी मांडली आहे. देखाव्यात १८ कार्यकर्ते विविध भूमिका साकारत असून मंडळातील कार्यकर्त्यांनीच सर्व पात्रांची भूमिका केली आहे. सजीव अभिनय, संवाद आणि सामाजिक संदेशाच्या माध्यमातून अन्नभेसळीविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *