Headlines

अमळनेरमध्ये गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र खदानीत बुडाले:पालिका पथकाच्या सतर्कतेने दोघांचे प्राण वाचले




जळगावच्या अमळनेरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना होता होता टळली. देवळी येथील खदानीत गणपती विसर्जन करत असताना पिता-पुत्र अचानक पाण्यात बुडाले. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नगरपालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केल्याने दोघांचेही प्राण वाचले. नेमकं प्रकरण काय? अमळनेरमधील देवळी खदानीत गणपती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी एक पिता आपल्या 10 वर्षीय मुलासोबत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात गेला होता. मुलाने वडिलांचा हात पकडला होता. त्याचवेळी अचानक वडिलांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. वडिलांसोबत मुलगाही पाण्यात ओढला गेला. दोघेही पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र, जवळच उपस्थित असलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य सुरू केले. पथकाने काही वेळातच दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पालिका आणि अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच केलेल्या मदतीमुळे पिता-पुत्राचे प्राण वाचले. गणेश विसर्जनासाठी खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे. हेही वाचा… एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर अर्जुन खोतकरांचा मनोज जरांगेंना थेट इशारा:‘मिशीवर ताव देऊन बोलू नका, आम्हालाही मिशा आहेत’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. जरांगे यांनी शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांना इशारा दिला आहे. जालन्यात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *